spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आहे का? ‘तर’ या गोष्टी लक्षात ठेवा

आपल्यापैकी बरेच लोक जेवणापूर्वी पाणी पितात आणि काही लोकांना जेवणा नंतर पाणी पिण्याची सवय असते. काही लोकांना जेवणानंतर लगेच किंवा त्या दरम्यान खूप पाणी पिण्याची सवय असते.

आपल्यापैकी बरेच लोक जेवणापूर्वी पाणी पितात आणि काही लोकांना जेवणा नंतर पाणी पिण्याची सवय असते. काही लोकांना जेवणानंतर लगेच किंवा त्या दरम्यान खूप पाणी पिण्याची सवय असते. तसेच, जेवणानंतर पाणी पिण्यात कोणताही धोका नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा थेट परिणाम तुमच्या पोटावर आणि आरोग्यावर होऊ नये हे म्हणून तुम्हाला हे माहीत असायला हवे. जास्त पाणी प्यायल्याने पोटातील पचनसंस्था चांगली राहते. जड अन्न पचायला खूप वेळ लागतो.

वेळेला खूप महत्व द्या (Give importance to time)
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने तुमच्या पोटातील पाचक रस पातळ होऊ शकतो. ज्यामुळे तुमचे पचन ही मंदावते. जेवणानंतर मोठ्या प्रमाणात पाणी पिण्यापूर्वी ३० मिनिटे ते १ तास थांबावे. जेवल्यानंतर कधीही लगेच जास्त पाणी पिऊ नये. त्यामुळे जड अन्न पचायला खूप वेळ लागतो.

ओव्हरहायड्रेशन टाळा (Avoid overhydration)
हायड्रेटेड (Hydrated) राहणे खूप महत्वाचे असताना, जेवणादरम्यान किंवा नंतर जास्त पाणी प्यायल्याने सूज होण्याची शक्यता असते. त्यासोबतच अस्वस्थता होऊ शकते. एकाच वेळी एक मोठा ग्लास पाणी पिण्याऐवजी एक लहान घोट पाणी प्या. दिवसभर हायड्रेटेड राहण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे योग्य प्रमाणात पाणी पिणे हा आहे. पाचन तंत्राच्या योग्य कार्यासाठी पुरेसे हायड्रेशन फार आवश्यक आहे.

थंड पाणी (cold water)
अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची चूक कधीही करू नये, विशेषतः थंड पाणी. जर तुम्हाला सहन होत नसेल आणि जेवल्यानंतर तुम्हाला पाण्याची गरज असेल तर एक किंवा दोन घोट पाणी प्या, परंतु यापेक्षा जास्त पाणी पिऊ नका. कारण जास्त पाणी प्यायल्यामुळे पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो.
पाण्याचे योग्य वेळी सेवन केल्यास तुमच्या शरीराला पोषक अन्न पचणे खूप सोपे होते.

तुमच्या गरजांचा विचार करा (Consider your needs)
जेवणा दरम्यान किंवा नंतर पाणी पिण्याची सहनशीलता खूप वेगळी असू शकते. काही लोकांना जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास अस्वस्थता ही जाणवू शकते, तर काहींना कोणतेही नकारात्मक परिणाम जाणवत नाहीत. तुमचे शरीर तुम्हाला कोणत्या प्रतिक्रिया (reaction) देते याकडे लक्ष द्या आणि त्यानुसार पाण्याचे सेवन करा.

संतुलित आहार महत्वाचे आहे (A balanced diet is important)
फक्त पाणी कधी प्यावे यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा तुमच्या संतुलित आहाराला नेहमी प्राधान्य द्या. विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ आपले पचन योग्य करण्यास खूप योगदान देऊ शकतात. पौष्टिक अन्न, फळे आणि भाज्या देखील तुम्हाला पचनास फार मदत करू शकतात.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा: 

नाशिक मधील तलाठी परीक्षेत कॉपीचा प्रकार उघडकीस

मुग खायला आवडत नाही? मग घरी बनवा Healthy आणि Tasty चटकदार मुगाची चाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss