Thursday, November 30, 2023

Latest Posts

रोज जेवणात वापरण्यात येणाऱ्या हिरव्या आणि लाल मिरचीचे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

रोज जेवणात वापरण्यात येणाऱ्या हिरव्या आणि लाल मिरचीचे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

मिरच्यांचा वापर जेवणात नियमित होत असतो. तुम्ही बनवलेल्या कोणत्याही जेवणाला मिरची घातल्याशिवाय चव येत नाही, मिरचीत असलेलं कॅप्सेसिन नावाचे संयुग अन्नाला मसालेचर आणि तिखट बनवते. त्यामुळे मिरचीशिवाय अन्नाला चव येत नाही डाळी असोत, भाज्या असोत, किंवा कोणताही मांसाहारी पदार्थ असो, प्रत्येक पदार्थ स्वादिष्ट बनवण्यासाठी मिरचीचा वापर केला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या जेवणात वापरण्यात येणाऱ्या हिरव्या आणि लाल मिरच्या या दोन्हींपैकी कोणती मिरची जास्त फायदेशीर आहे? याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.

जाणून घ्या हिरव्या मिरची चे फायदे-

संशोधनानुसार मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि इतर पोषक तत्व योग्य प्रमाणात आढळतात. पण नियमित मिरचीचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते, कॅप्सेसिनचे प्रमाण लाल मिरचीपेक्षा हिरव्या मिरचीमध्ये कमीअसते, ज्यमुळे पचनासाठी ती अधिक उपयुक्त ठरते, हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए,कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह सारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हिरव्या मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात जे पेशींना नुकसान होण्यापासून बचाव करतात. हिरवी मिरचीचे नियमित सेवन केल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य सुधारते. त्यामुळे लाल मिरचीपेक्षा हिरव्या मिरचीचे सेवन अधिक सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते.

वजन कमी करण्यासाठी हिरवी मिरची फायदेशीर-

पचनसंस्थेसाठी हिरव्या मिरचीचे सेवन पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर मानली जाते, फायबर चे प्रमाण हिरव्या मिरचीमध्ये जास्त प्रमाणात असते जे पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करत, आतड्यांसंबंधी हालचाल फायबरमुळे वाढते ज्यामुळे बद्धकोष्ठ सारखे आजार दूर होतात. तसेच हिरव्या मिरचीमध्ये असलेले एन्झाइम अन्न पचण्यास मदत करतात. याशिवाय हिरव्या मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखीलआढळतात जे पोटात जळजळ आणि पोटासंबंधित संसर्ग टाळतात. त्यामुळे हिरवी मिरचीचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. हिरव्या मिरचीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करतात ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

हे ही वाचा : 

‘RSS’च्या १०० वर्षांच्या इतिहासावर बेतलेली वेबसीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला

तुमचे गाल देखील थंडीत लाल होतात?, तर फॉलो करा या सोप्या टिप्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss