मॉर्निंग वॉक(morning walk) हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. जे तुम्ही रोज सकाळी काही पावले चालत असाल तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र मॉर्निंग वॉकची सवय परिपूर्ण असावी. जे तुम्ही सकाळी चुकीच्या मार्गाने चालत असाल तर यामुळे तुम्ही आजारी देखील होऊ शकता. तज्ञाच्या मते सकाळी चालल्याने स्नायू मजबूत, हाडे निरोगी आणि वजन नियंत्रित राहते. मात्र, त्याची पद्धत योग्य नसेल तर ती हानिकारक(Harmful) ही ठरू शकते. मॉर्निंग वॉक करण्याची योग्य पद्धत कोणती आहे, ते जाणून घेऊयात.
पोट भरून खाऊ नका (Do not eat full)
जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉकसाठी जाता तेव्हा हे लक्षात ठेवा की काहीही जड पदार्थाचे सेवन करू नका. यामुळे पचनाच्या समस्या ही निर्माण होऊ शकतात. सकाळी लवकर काही खायचे असेल तर हलका आणि पौष्टिक आहारच घ्या. फळे आणि दही यांसारख्या पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर आहे. यामुळे ऊर्जा मिळते आणि आपले आरोग्य ही चांगले राहते.
पाणी पिण्यास विसरू नका (Don’t forget to drink water)
मार्निंग वॉक साठी जाताना पाणी पिऊन बाहेर जा. त्यामुळे चालत असताना, शरीरातील हायड्रेशन(hydration) टिकून राहण्यास मदत होईल. सकाळी चालण्याआधी पाणी प्यायल्याने ऊर्जा पातळी(energy level) वाढते आणि शरीर अधिक सक्रिय राहते.
योग्य शूज निवडा (Choose the right shoes)
मॉर्निंग वॉक करताना तुमचे शूज(shoes) योग्य असावेत. आरामदायक आणि फिटिंग वॉकिंग शूज (fitting walking shoes)निवडणं गरजेचे आहे. चालण्याचे शूज जितके आरामदायी किंवा फिट असतील तेवढेच ते आरोग्यासाठी चांगले आहेत. नेहमी चांगले ग्रीप(grip) असलेले शूज निवडा. त्यामुळे चालताना त्रास होणार नाही.
वॉर्म अप करायला विसरू नका (Don’t forget to warm up.)
मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी वॉर्म अप(warm up) खूप महत्त्वाचे मानले जाते. यामुळे शरीर चालण्यासाठी चांगले तयार होते. त्यामुळेच स्नायू व्यवस्थित काम करू लागतात. वैद्यकशास्त्रानुसार, चालण्याआधी 5-10 मिनिटे वॉर्म अप खूप आवश्यक आहे. यामुळे तुमचा मॉर्निंग वॉक चांगला होईल आणि आरोग्य सुरक्षित आणि निरोगी राहील. जर तुम्ही रोज सकाळी मॉर्निंग वॉक करताना या सवयी अंगीकारल्या तर तुमचे आरोग्य निरोगी आणि तंदुरुस्त राहील.
या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.
हे ही वाचा:
5 Healthy Fruit Juice,पचनाच्या समस्यांसाठी ‘या’ ज्यूसचा आहारात करा समावेश
मुग खायला आवडत नाही? मग घरी बनवा Healthy आणि Tasty चटकदार मुगाची चाट