spot_img
spot_img

Latest Posts

भाद्रपद महिन्यातील पिठोरी अमावस्येचे महत्व तुम्हला माहित आहे का ?

भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून साजरी केली जाते. हिंदू महिन्यात भाद्रपद महिन्यातील या अमावास्येला मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी पितरांची पूजा केली जाते, तसेच दुर्गा देवीची पूजा देखील केली जाते.

भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून साजरी केली जाते. हिंदू महिन्यात भाद्रपद महिन्यातील या अमावास्येला मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी पितरांची पूजा केली जाते, तसेच दुर्गा देवीची पूजा देखील केली जाते. पंचांगानुसार येणाऱ्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या म्हणतात. या अमावस्याला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या, किंवा दर्श अमावस्या असे देखील बोलले जाते. पिठोरी अमावस्याला स्त्रिया आपल्या मुलांसाठी उपवास करतात. पितरांना तर्पणसोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते.

पंचांगानुसार या वर्षतील भाद्रपद महिन्यातील अमावस्या १४ सप्टेंबर २०२३ रोजी येणार आहे. ही अमावस्या १४ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटे ०४:४८ पासून सुरू होईल आणि १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०७:०९ पर्यंत संपेल. भाद्रपद महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गादेवीसह ६४ देवाची पूजा केली जाते. पिठोरीमध्ये पीठ या शब्दाचा अर्थ पिठ असा होतो. त्यामुळे पिठोरी अमावस्या असे बोले जाते. या दिवशी पूजा, जप आणि तपश्चर्या सोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्वाचे मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार ही अमावस्या तिथी पितरांशी संबंधित दोष दूर करण्यासाठी उपयुक्त मानली जाते.

हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी उपवास करुन सायंकाळी स्नान करतात.त्यानंतर चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. या दिवशी पूजेमध्ये खीर-पुरी, पुरणपोळी, साटोरी, असे पदार्थ तयार करतात . व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायु अपत्य होतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा देखील करण्यात येते. या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतं.

Latest Posts

Don't Miss