Thursday, April 18, 2024

Latest Posts

तुम्हाला पोहे खायला आवडतात? ही बातमी फक्त तुमच्यासाठी…

अनेक लोक सकाळच्या नाश्त्यात हमखास पोहे खातात. पोहे हा सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच पोहे खायला आवडतात.

अनेक लोक सकाळच्या नाश्त्यात हमखास पोहे खातात. पोहे हा सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच पोहे खायला आवडतात. पोहे पचायला अगदी हलके असतात तसेच चवीला सुद्धा अगदी छान असतात. भात सुद्धा पोह्यांसारखाच परंतु शास्त्रज्ञाच्या मते भात हा आपल्या शरीरासाठी तसेच आरोग्यासाठी चांगला नसतो. कंज्युमर रिपोर्ट्स मधील एका रिपोर्ट नुसार भातात अर्सेनिकच प्रमाण प्रचंड असत कि जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असत. अति अर्सेनिक सेवन केल्यामुळे आपल्याला त्वचा, मज्जासंस्था आणि फुफ्फुसांशी निगडित आजार होउ शकतात.

नेहमीच्या पोह्यांमधे चरबीचे तसेच साखरीचे प्रमाण शून्य असते. पोहे बनवताना त्यात विविध प्रकारच्या पाले भाज्या टाकल्याने त्याच्यातील पौष्टीक गुणात कोणताही बदल होत नाही. या मुळे पोहे लहानमुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी प्रचंड पौष्टिक असतात. पोहे बनवताना चांगल्या गोडतेलाचा वापर करणे आवश्यक असते. आहार तज्ज्ञांच्या मते भात व पोहे यांच्या तुलनेत पोह्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर तसेच चांगले आहे. चला तर मग जाणून घेऊयात पोहे खाल्याने नेमके कोणते फायदे होतात.

पोह्यात फायबरचे प्रमाण जास्त असते –

पोह्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर मिळते . १०० ग्रॅम पोह्यापासून २ ते ४ ग्रॅम इतके फायबर आपल्या शरीराला मिळते तसेच तब्बल ७० ग्रॅमपर्यंत आरोग्यदायी कार्बोहायड्रेट्स सुद्धा मिळतात. भातासारखं पोह्याला पॉलिश केलं जात नाही. पोह्यांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात राहते.

पोह्यात लोहाचे प्रमाण जास्त असते –

पोह्यामध्ये लोह प्रचंड प्रमाणात उपलब्ध असतं. यामुळे जी लोकं आयनेमिया आजाराने ग्रस्त असतात त्यांच्या आहारात पोह्याचा समावेश केल्याने आरोग्यासाठी चांगले असते. पोह्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणात दूर होते. पोहे खाताना त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकल्याने
पोह्याला चव येते तसेच पोह्यातील लोह पचवण्यासाठी सोपे जाते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर –

पोहे पाहायला अगदी हलके असतात. पोह्याच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे शरीराला मिळतात. पोह्यांमध्ये कॅलरीज चे प्रमाण देखील कमी असतं. त्यामुळे पोहे खाल्यान्ने आपले वजन वाढत नाही.

जीवनसत्त्वं आणि खनिजे भरपूर असतात –

पोहे बनवताना लसूण, कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या या पदार्थांचा नेहमी वापर होतो. या पालेभाज्यांमुळे शरीराला अनेक पोषक सत्व आणि घटक मिळतात. पोह्यांतील हिरव्यामिरची मुळे तसेच लिंबाच्या रसामुळे शरीराला जीवनसत्व ‘सी’ (Vitamin ‘C’) मोठ्या प्रमाणात मिळते.

हे ही वाचा:

Gautami Patil चा कार्यक्रमाचे आयोजन करणे पडले महागात…

शिरपूरच्या तृप्तीची आधुनिक हिरकणी सारखीच गोष्ट

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनंतर घेतली एकनाथ शिंदेची भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss