spot_img
spot_img
Wednesday, September 20, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

तुम्ही सतत एसीमध्ये बसता… ? तर हे नक्की वाचा

गरमी असो वा नसो परंतु काही लोकांना एसीची सवयच झालेली असते. घर असो वा ऑफिस किंवा कार सगळीकडेच त्यांना एसी हा हवा असतो. पण तुम्हाला हे माहित आहे का ?...

मुंबई :- गरमी असो वा नसो परंतु काही लोकांना एसीची सवयच झालेली असते. घर असो वा ऑफिस किंवा कार सगळीकडेच त्यांना एसी हा हवा असतो. पण तुम्हाला हे माहित आहे का ?… ही सवय तुम्हाला अनेक आजारांच्या दारात नेऊन ठेवू शकते. उन्हाळ्यात एसीशिवाय राहणं शक्य तर नाही, पण त्याचा वापर कमी केला जाऊ शकतो. २४ तास एसीमध्ये राहिल्याने ताजी, स्वच्छ हवा मिळत नाही. कारण एसी सुरु करण्यापूर्वी खिडक्या आणि दारं बंद केले जातात. या रुममध्ये हवा तेवढ्याच परीसरात बंद होते. ताजी हवा न मिळणे तुमच्या शरीराच्या विकासात अडथळा निर्माण करु शकते.

बदलती लाइफस्टाईल फक्त आपल्या आरोग्यावर नाही, तर हाडांवरही प्रभाव करत आहे. हाडांना मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार आणि पौष्टीक अन्न सेवन करणे गरजेचे आहे. खूप वेळ वातानुकूलित वातावरणात राहिल्यामुळे हाडं कमकूवत होतात. त्यामुळे एसीची सवय हि सोडा, तेव्हाच तुमच्या हाडांची मजबुती टिकून राहील. एसी शिवाय आणखी खूप गोष्टी आहेत, जे करणे टाळले पाहिजे, जर तुम्हाला हाडांना मजबूत ठेवायचे असेल तर. हाडांच्या वेगवेगळ्या समस्याही तुम्हाला हळूहळू जाणवू लागतात. एसीमध्ये झोपल्याने रुममध्ये तापमान खूप होतं. अशात शरीरही खूप थंड होतं आणि आपल्याला याचा अंदाजही होत नाही. याच थंडीमुळे हाडांची समस्या तुम्हाला भेडसावू शकते. हीच समस्या पुढे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देते. हाडांना मजबूत ठेवण्यासाठी अशा गोष्टींचे सेवन करा ज्यात विटामिन-डी अधिक प्रमाणात आहे. जेवणात दूध, बदाम, तांदूळ, जूस या गोष्टींचा समावेश करा.

एसीमुळे जसा शरीरातील हाडांवर परिणाम होतो तसेच आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो.

  • त्वचेसंबंधी समस्या :- एसीचा सर्वात जास्त वाईट प्रभाव हा त्वचेवर पडतो. घाम येणे त्वचेच्या स्वच्छतेची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण दिवसभर एसीमध्ये बसल्यास तुम्हाला घाम येत नाही. त्यामुळे कार्बनसारखे घातक तत्व त्वचेवर चिकटतात, याने त्वचेसंबंधी अनेक आजार होऊ शकतात. यात त्वचेचा कॅन्सर याचाही धोका असतो. एसीमुळे तुमच्या त्वचा कोरडी होते.
  • रक्तसंचार :- एसीमध्ये जास्तवेळ बसल्याने शरीराचं तापमान कृत्रिमरित्या अधिक कमी होतं आणि यामुळे पेशी आकुंचन पावतात. याच कारणाने शरीरात रक्तसंचार कमी होतो.
  • ब्लड प्रेशर आणि अस्थमा :- जर तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या असेल तर तुम्ही एसीचा कमी वापर करणे तुमच्यासाठी चांगलं असेल. एसीमुळे तुम्हाला लो ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. त्यासोबतच श्वास घेण्यासही तुम्हाला त्रास होऊ शकतो. अस्थमाच्या रुग्णांची एसीपासून दूर रहायला हवं.
  • ताप येणे :- सतत एसीमध्ये बसल्याने तुम्हाला ताप येणे आणि थकवा जाणवणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. इतकेच नाही तर तापमान वाढवल्यास तुम्हाला डोकेदुखी आणि चिडचिड होऊ शकते. एसीमधून बाहेर गरम जागी गेल्यास तुम्हाला जास्त ताप येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • गरमीचा त्रास :- ज्या लोकांना एसीची सवय झालेली असते त्यांची गरमीची सहनशीलता खूप कमी होते. त्यांना उन्हात जास्त राहणे कठिण होऊन बसतं. ते जराही सूर्यकिरण सोसू शकत नाहीत. हे खासकरुन अधिक गरमीच्या ठिकाणी जास्त त्रासदायक ठरतं.

हे ही वाचा :- 

भाजप त्यांच्या मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शरद पवारांचे विधान  

 

Latest Posts

Don't Miss