Thursday, November 30, 2023

Latest Posts

तुमचे गाल देखील थंडीत लाल होतात?, तर फॉलो करा या सोप्या टिप्स

तुमचे गाल देखील थंडीत लाल होतात?, तर फोल्लो करा या सोप्या टिप्स

बदलत्या वातावरणाचा आपल्या शरीरावर परिणाम तर होतोच, पण शरीरासोबत याचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्यासारख्या समस्या खूप वाढतात. त्याचा प्रभाव आपल्या ओठ, गाल, हाथ, पाय याच्यावर दिसून येतो. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची खास काळजी घ्यावी लागते. तसेच थंडीच्या दिवसात दिसणारी आणखी एक समस्या म्हणजे गाल लाल होणे. हिवाळ्यात गाल लाल का पडतात? ही कोणत्याप्रकारची समस्या आहे जी बरी होऊ शकते? यासंदर्भात अधिक माहिती आज जाणून घेऊयात…

थंडीत गाल लाल का होतात?

थंडीच्या दिवसात शरीरातील रक्तभिसरण मंद होते, अश्या वेळी त्वचेच्या आत असलेल्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठयासाठी बंद होतात, जेणेकरून चेहऱ्यावर आवश्यक प्रमाणात रक्तपुरवठा होईल. जेव्हा थंडी खूप प्रमाणात असते तेव्हा आपले शरीर आपल्या त्वचेला उबदार करण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे मंद झालेलं रक्तभिसरण वाढते आणि आणि गाल देखील लाल होतात. याशिवाय मॉइश्चरायझेशन, थंड हवा आणि पोषणाचा अभाव यामुळेही आपली त्वचा लाल होऊ लागते.

त्वचा लाला होण्यापासून रोखण्याचे काही उपाय :

१. शरीर दिवसभर हायड्रेटेड ठेवा-

उन्हाळयाच्या तुलनेत थंडीच्या दिवसात पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहत नाही आणि हैड्रेशनच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी पडत जाते, यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.

२. कोलेजनयुक्त प्रोडक्ट वापर-

वयानुसार कोलेजन कमी होते, कोलेजन हे आपल्या त्वचेवर ब्लॉक म्हणू काम करतं ज्यामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहते, याशिवाय त्वचेचा कोरडेपणा देखील जातो. जर हिवाळ्यात तुमची गाल किंवा त्वचा लाल झाले आणि नंतर क्रॅक होऊ लागले, तर तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये कोलेजन सप्लिमेंट्स किंवा कोलेजनयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

३. हायड्रेटिंग सीरम वापरावा-

त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी Hyaluronic ऍसिडयुक्त सीरम देखील तुम्ही वापरू शकता. लालसरपणा आणि कोरड्या त्वचेसाठी हायड्रेटिंग सीरम हा एक चांगला पर्याय मानला जातो. पण, सीरम वापरण्यापूर्वी तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घ्या आणि त्याप्रकारे सिरम वापरावा.

4. हायड्रेटिंग मास्क वापरा-

हायड्रेटिंग मास्क देखील कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी खूप उपयुक्त पर्याय ठरू शकतो. तुमची त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि बाहेरून हायड्रेट ठेवण्यासाठी हायड्रेटिंग मास्कचा वापरा. आठवड्यातून एकदा तरी हायड्रेटिंग मास्कचा वापर करा. तुम्हाला काही दिवसांतच त्वचेत फरक जाणवेल.

हे ही वाचा : 

छोट्या पडद्यावरील मालिकेंचा टीआरपी रेटिंग,कोणत्या मालिकेनं मारली बाजी ?

Kalyan-Dombivali Loksabha Constituency भाजपला मिळावी, ही कार्यकर्त्यांची इच्छा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss