Thursday, March 28, 2024

Latest Posts

या चुका केल्यात तर तुमच्या केसांचं होईल नुकसान

आपल्या प्रत्येकालाच आपले केस अतिशय प्रिय असतात. आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करतो.

आपल्या प्रत्येकालाच आपले केस अतिशय प्रिय असतात. आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करतो. आपल्या केसांची योग्य प्रकारे आपण निगा राखली नाही तर आपल्याला केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपले केस सुंदर दिसावे यासाठी आपण अनेक नैसर्गिक उपाय करतो त्याचबरोबर बाजारातून अनेक मोठमोठ्या ब्रँड (Brand) चे महागडे प्रोडक्टस आपण वापरतो. आजकाल प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच भरपूर तापमानाने आपले केस मोठ्याप्रमाणावर खराब होतात. अकाली केस पांढरे होणे, केसात भरपूर कोंडा होणे, केस गळती, केसात खाज येणे अश्या केसांच्या अनेक समस्यांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात समतोल आहार राखतो. आपण केसांच्या चांगल्या आरोग्यसाठी अनेक उपाय करतो मात्र आपल्याकडून काही नकळत चुका होतात. अशा चुकांमुळे आपण जे महागडे प्रोडक्टस वापरतो आपण अनेक उपाय करतो त्याचा काहीही फायदा होत नाही. चला तर मग जाणून घेऊया या चुका आहेत तरी कोणत्या?

अति गरम पाण्याने केस धुणे

तुम्ही जर केस हे गरम पाण्याचे धुवत असाल तर ते अत्यंत चुकीचे आहे. गरम पाण्याने आपण केस धुतले तर त्याचा परिणाम आपल्या केसांच्या मुळांवर होतो. आपल्या केसांची मूळ गरम पाण्यामुळे जळू शकतात आणि ती कमकुवत होतात आणि याच करणामुळे आपल्याला केस गळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच गरम पाण्याच्या वापरामुळे आपले केस हे अतिशय कोरडे होतात.

ड्रायर आणि हीटिंग टूल

तुम्ही जर रोज केसांसाठी ड्रायर आणि कोणतेही हीटिंग टूल वापरत असाल तर ते अत्यंत चुकिचे आहे. ड्रायर आणि हीटिंग टूल केसांना मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहचवते. ड्रायर च्या अतिवापरामुळे आपले केस निर्जीव बनतात व आपल्या केसांवरील चमक पूर्णपणे निघून जाते. त्याशिवाय अशा गोष्टींचा आपल्या केसांच्या मुळांवर भरपूर परिणाम होतो. केसांची मूळ कमकुवत बनून केस गळतीचे प्रमाण वाढते. त्यामुळे दररोज ड्रायर आणि हीटिंग टूल अशा गोष्टींचा वापर करणे टाळा.

टॉवेलने केस घासू नका

अनेकजणांना केस धुतल्यानंतर टॉवेलने केस जोरजोरात घासून पुसण्याची अत्यंत वाईट सवय असते. असे केल्याने तुमच्या केसांचे भरपूर प्रमाणात नुकसान होऊ शकते. टॉवेलने केस जोरजोरात पुसल्यावर तुमचे केस तुटण्याचे चान्सेस (Chances) जास्त असू शकतात. त्याशिवाय केसांना इजा होऊ शकते. म्हणूनच केस पुसण्यासाठी टॉवेलच्या ऐवजी कोणतेही सुती कापड वापरावे व केस हळुवार हलक्या हाताने पुसून घ्यावे.

हे ही वाचा:

येलो आर्मी Indian Premier league 2023 चा विजेता

तुम्हाला माहित आहे का Express Train ची नावं कशी व कोणाकडून दिली जातात; जाणून घ्याबद्दल संपूर्ण माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss