Friday, March 29, 2024

Latest Posts

ग्रीन टी पिताना ‘या’ चुका करू नका…फायद्यापेक्षा तोटाच होईल

आपल्या बऱ्याच जणांना ग्रीन टी (Green tea) चे फायदे माहीतच असतील. ग्रीन टी चा उपयोग हा प्रामुख्याने फिट राहण्यासाठी होते. त्यामुळे बरेच लोक ग्रीन टी पिण्यास पसंत करतात. अनेक डाएट कॉन्शिअस आपल्याला ग्रीन टी पिण्याचा सल्ला देत असतात.

आपल्या बऱ्याच जणांना ग्रीन टी (Green tea) चे फायदे माहीतच असतील. ग्रीन टी चा उपयोग हा प्रामुख्याने फिट राहण्यासाठी होते. त्यामुळे बरेच लोक ग्रीन टी पिण्यास पसंत करतात. अनेक डाएट कॉन्शिअस आपल्याला ग्रीन टी पिण्याचा सल्ला देत असतात. तसे त्याचे फायदे देखील अनेक आहेत. हेल्दी (Healthy ) आयुष्य जगण्यासाठी ग्रीन टी हा प्रत्येकानेच प्यायला पाहिजे. ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने तुम्ही फिट तर रहालाच पण त्यासोबतच तुमच्या चेहऱ्याला ग्लो (Glow) सुद्धा येईल. तुम्ही ग्रीन टी चे सेवन केल्याने तुमच्या रोज ताजेतवाने वाटेल व काम करण्यासाठी एनर्जी (Energy) मिळेल. ग्रीन टी हा शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. ग्रीन टी मिले आपल्याला ऍसिडिटी (Acidity) होत नाही. ग्रीन टी चे नियमित सेवन केल्याने तुमची प्रतिकार शक्ती(Immunity Power ) वाढते. त्याचबरोबर ग्रीन टी पिण्याचे मुख्य कारण म्हणजे आपले वजन नियंत्रणात राहते. ग्रीन टी चे नियमित सेवन केल्याने आपले वजन कमी होते.

ग्रीन टीचे सेवन करण्याचे फायदे हे अनेक आहेत. पण तुम्हाला माहित आहे जर तुम्ही ग्रीन टीचे सेवन हे योग्य प्रकारे केले नाही तर तुमच्या आरोग्याचे अतिशय नुकसान होऊ शकते. ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत फार कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे बरेच लोक ग्रीन टि अयोग्य पद्धतीने पितात. ग्रीन टीचे सेवन करण्यासाठी एक योग्य पद्धत असते. तश्या योग्य पद्धतीने आपण जर ग्रीन टी चे सेवन केले तर आपल्या आरोग्याचे नुकसान होत नाही. चला तर मग जाणून घेऊया ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत.

ग्रीन टीचे योग्य प्रमाण: (Right amount of green tea)

ग्रीन टी आपल्या शरीरासाठी किती लाभदायक आहे ते सर्वांनाच माहित आहे. ग्रीन टी चे सेवन हे वजन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केले जाते. ग्रीन टी आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे. अनेक लोक हे वजन कमी करण्यासाठी तसेच चेहऱ्यावर ग्लो येणासाठी ग्रीन टी पितात. पण त्यांना असे वाटते ग्रीन टी चे सेवन हे जास्त प्रमाणात केले तरच त्याचा उपयोग होईल. पण हे अगदी चुकीचे आहे. तुम्हाला ती म्हण माहीतच असेल अति तेथे माती म्हणजेच आपण कोणत्याही गोष्टीची अति केली तर तिथे आपली माती होतेच म्हणजेच नुकसान हे होतेच. तुम्ही जर ग्रीन टी चे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. तुम्हाला पचनाच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे ग्रीन टी चे सेवन योग्य प्रमाणात करा.

ग्रीन टी चे सेवन योग्य वेळेत करा: (Consume green tea at the right time)

वजन कमी करण्यासाठी तसेच चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तुम्ही ग्रीन टी चे सेवन हे करताच. पण ग्रीन टी चे सेवन हे कधीही करून नाही चालत. ग्रीन टी चे सेवन जर तुम्ही कधीही कोणत्याही वेळी केलेत तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. ग्रीन टी चे सेवन करण्याची योग्य वेळ असावी. तुम्ही जर ग्रीन टी रात्रीच्या वेळी पित असाल तर ते अत्यंत चुकीचे आहे. झोपण्याच्या आधी ग्रीन टी चे कधीही सेवन करून नये. त्याच बरोबर तुमच्या जेवणानंतर ग्रीन टी चे लगेचच सेवन करू नये. तुम्ही जर जेवणानंतर ग्रीन टी चे सेवन केले तर तुमच्या शरीराला जेवणातील पोषक घटक मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही जेवणानंतर १ किंवा २ तासांनी ग्रीन टी चा लाभ घेऊ शकता.

ग्रीन टी चे सेवन रिकाम्या पोटी करू नये: (Green tea should not be consumed on an empty stomach)

अनेक जण सकाळी उठल्या उठल्या ग्रीन टी पितात. पण ते अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही जर रोज सकाळी काही न खाता पिता ग्रीन टी चे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक. तुम्ही काही खाल्ल्याशिवाय ग्रीन टी चे सेवन करत असाल तर तुमच्या पोटात ऍसिड(acid) तयार होऊ शकत त्याचे कारण म्हणजे ग्रीन टी मध्ये टॅनिन असतं.

ग्रीन टी च्या बॅग्ज पुन्हा वापरू नका: (Do not reuse green tea bags:)

काही लोकांना कोणत्याही वस्तूंच्या बॅग्ज जपून ठेवून त्या पुन्हा वापरण्याची सवय असते. परंतु तुम्ही ग्रीन टी च्या बॅग्ज पुन्हा वापरण्याची चूक करू नका. तुम्ही जर त्या बॅग्जचा वापर पुन्हा केलात तर ग्रीन टी ची चव निघून जाईल. आणि तुम्हाला चांगली चव मिळणार नाही.ग्रीन टी चे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. प्रत्येकाने ग्रीन टी चे सेवन केले पाहिजे. पण त्याचे सेवन करताना त्याच्या योग्य पद्धती लक्षात ठेवा.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

घरच्या घरी बनवा, बेक्ड सुरण फलाफल विथ बीटरूट हमस

बनवा आरोग्यासाठी लाभदायक नाचणीचा केक; मधुमेह असलेल्यानाही खाता येईल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss