Tuesday, May 30, 2023

Latest Posts

बाजारातून काकडी विकत घेताना करू नका ‘या’ चुका

आपल्या स्वयंपाक घरात काकडी पासून अनेक पदार्थ बनविले जातात. तसेच काकडी आपण सॅलड (Salad) म्हणून देखील खातो. काकडी ही थंड असून कडकी खाल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. आपल्या दैनंदिन आहारात काकडीचे नियमित सेवन केल्याने आपले आरोग्य निरोगी राहते.

आपल्या स्वयंपाक घरात काकडी पासून अनेक पदार्थ बनविले जातात. तसेच काकडी आपण सॅलड (Salad) म्हणून देखील खातो. काकडी ही थंड असून कडकी खाल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. आपल्या दैनंदिन आहारात काकडीचे नियमित सेवन केल्याने आपले आरोग्य निरोगी राहते. काकडीचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहते. आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तर आपल्याला अनेक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. म्हणूच आपल्या रोजच्या आहारात काकडीचा समावेश असला पाहिजे. काकडीचे नियमित सेवन केल्याने आपली त्वचा देखील निरोगी राहते. काकडी ही आपल्या अंगातील हिट (heat) कमी करते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पुरळ येत नाही. पण काही वेळेस आपण बाजारातून काकडी आणल्यावर ती कापून खाण्यावर कडू लागते. कडू झालेली काकडी खराब असते व अश्या कडू झालेल्या काकडीचे कधीही सेवन करू नये. म्हणूनच बाजारातून काकडी विकत घेताना ती तपासून घ्यावी. चला तर मग आज आम्ही तुम्हाला बाजारातून काकडी तपासण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.

सालावरून ओळखावी काकडीची चव:

बाजारातून काकडी विकत घेताना सर्वात आधी काकडीची साले नीट तपासून घ्यावी. काकडीचे साल जर गडत हिरव्या रंगाचे असेल आणि त्यावर किंचित पिवळसरपणा असेल तर ती काकडी खाण्यास योग्य असे समजावे. अशी काकडी ही ताजी असते आणि त्यात जरासाही कडवटपणा नसतो. त्यामुळे काकडी विकत घेण्याआधी त्याची सालं नक्कीच तपासली पाहिजेत.

काकडीचा आकार:

आपण काकडीपासून अनेक पदार्थ बनवतो. काकडी पासून घारगे देखील बनवले जाते. जास्त जणांचे जेवण बनविण्यासाठी आपण जाड काकडी घेतो परंतु तशी चूक करू नका. आपल्याला बाजारात अनेक आकाराच्या अनेक जातीच्या काकड्या दिसून येतात. परंतु लक्षात ठेवा काकडी विकत घेताना नेहमी लहान आकाराच्या काकड्या विकत घ्याव्या.

नरम असलेली काकडी घेऊ नये:

चांगल्या काकडीची पारख करतात काकडी दाबून बघावी. काकडी जर आपल्या हाताला नरम लागली तर त्या काकडीमध्ये बियांचे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे नेहमी काकडी विकत घेताना टणक असलेल्या काकडीला प्राधान्य द्यावे. नरम झालेली काकडी ही फ्रेश (Fresh) नसते. त्यामुळे तुम्ही नरम झालेल्या काकडी चे सेवन केले तर तुमचे आरोग्य बिघडू शकते.

पांढऱ्या रेषा असलेल्या काकड्या घेऊ नये:

बाजारात जाऊन काकडी विकत घेताना तुम्ही काकड्या चांगल्या बघून घ्याव्यात. काकडीवर जर पांढऱ्या रेषा असतील तर तशी काकडी घेणं टाळावं. पांढऱ्या रेषा असलेल्या काकड्या चवीला जास्त प्रमाणात कडवट असतात त्यामुळे अश्या काकड्या घेणं टाळावं.

हे ही वाचा:

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

राहुल गांधी यांना मिळाला दिलासा

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी २ व ३ जून रोजी मतदार संघनिहाय बैठक, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss