Thursday, April 25, 2024

Latest Posts

सकाळी दात घासण्याआधी प्या पाणी.. आरोग्यासाठी आहे फायदेशीर

पाणी हे आपल्या शरीरासाठी असलेली महत्वाची गोष्ट आहे. आपल्या दैनंदिन जीवनात रोज जवळजवळ सात ते आठ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. कमी पाणी प्यायल्यानंतर आपल्याला अनेक समस्या होऊ शकतात. कडकडीत उन्हात तर आपल्या शरीरातील पाणी भरपूर प्रमाणात कमी होते.

पाणी हे आपल्या शरीरासाठी असलेली महत्वाची गोष्ट आहे. आपल्या दैनंदिन जीवनात रोज जवळजवळ सात ते आठ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. कमी पाणी प्यायल्यानंतर आपल्याला अनेक समस्या होऊ शकतात. कडकडीत उन्हात तर आपल्या शरीरातील पाणी भरपूर प्रमाणात कमी होते. त्यामुळे आपल्याला पाण्याची गरज भासते. दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील सर्व प्रकारचे वाईट टॉक्सिन निघून जातात व आपले शरीर निरोगी बनते. रोज सकाळी लवकर उठून पाणी पिण्याचा सल्ला आपल्याला नेहमीच मिळत असतो. काहीजण सकाळी उठून दात घासल्यानंतर व तोंड धुतल्यानंतरच सर्व काही करतात. पण तुम्हाला माहित आहे सकाळी उठल्यावर दात घासण्याआधी पाणी पिण्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. तुम्ही जर दात घासण्याआधी पाणी प्यायलात तर तुमच्या शरीरातील अनेक विषारी अथवा तुमच्या आरोग्यासाठी घातक असलेले घटक निघून जातील. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल . चला तर मग दात घासण्याआधी पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊया.

पचनक्रिया सुरळीत राहते: (Digestion remains smooth)

तुम्ही जर दात घासण्याआधी योग्य प्रमाणात पाणी प्यायला तर तुमचे आरोग्य चांगले राहते. तुम्ही जर दात घासण्याआधी भरपूर प्रमाणात पाणी प्यायला तर तुम्हाला पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. तुमच्या पंचनसंस्थेचे कार्य व्यवस्थित सुरु राहते. तसेच तुमच्या तोंडातील बॅक्टेरियांचा नाश होतो. त्यामुळे तुम्ही दात घासण्याआधी भरपूर पाणी प्यायले पाहिजे.

प्रतिकारशक्ती वाढते: (Increases immunity)

सकाळी उठल्यावर दात घासण्याच्या आधी तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्यायला तर तुमची प्रतिकार शक्ती वाढते. तुम्ही सहज रित्या कोणत्याही आजाराला सामोरे जाऊ शकता. दात घासण्याआधी तुम्ही पाणी थोड्या प्रमाणात कोमट करून प्यायले पाहिजे अश्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते.

केस चमकदार होतात: (Hair becomes shiny)

केस चमकदार होण्यासाठी आपण बरेच उपाय करतो. बाजारातून अनेकप्रकारचे महागडे प्रॉडक्ट्स (Products ) विकत घेतो. पण त्याने आपल्याला हवा तास परिणाम होत नाही त्याउलट आपले नुकसानच होते. परंतु तुम्ही रोज सकाळी उठल्यावर दात घासण्याचा आधी पाणी प्यायला तर त्याने तुमचे केस चमकदार होतील. तसेच केसांच्या अनेक समस्यांपासून तुम्ही कायमचे दूर रहाल.

उच्च रक्तदाबाच्या समस्या होणार नाही: (There will be no problem of high blood pressure)

काही लोकांना दात घासण्याआधी काहीही करायला आवडत नाही अगदी पाणी सुद्धा ते पित नाहीत. पण जे तुम्ही दात घासण्याआधी पाणी पिण्याची सवय लावून घेतली तर तुम्हाला उच्च रक्तदाबाच्या समस्या निर्माण होणार नाहीत. तुम्हाला जर उच्च रक्तदाबाच्या समस्या असतील तर त्यासाठी तुम्ही ही सवय नक्कीच लावली पाहिजे.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

रोज सकाळी दात घासण्याचा आधी भरपूर प्रमाणात पाणी पिणे ही सवय मधुमेह असलेल्यांसाठी अतिशय उत्तम आहे त्याचे कारण म्हणजे आपल्या शरीरातील रक्तात असलेली साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

हे ही वाचा : 

पाहा रवी शास्त्रींची प्लेइंग ११, या खेळाडूंना टीममध्ये घेणे टाळले

कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर सनीची पहिल्यांदाच एंट्री

घरात पाल येण्याच्या त्रासाला कंटाळले आहेत का ? मग हे उपाय नक्की करा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss