spot_img
spot_img

Latest Posts

चहा कॉफी पिणे आरोग्यास हानिकारक! सकाळी उठल्यानंतर प्या ‘हे’ ड्रिंक, आरोग्यासाठी आहेत फायदेशीर

काही लोक तर चहाचे इतके प्रेमी आहेत की, दिवसाला ३ ते ४ वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ चहा घेतात. चहा तर आपल्या जीवनातील इतका महत्वाचा भाग झाला की, त्या शिवाय आपण निवांत राहूच शकत नाही.

काही लोक तर चहाचे इतके प्रेमी आहेत की, दिवसाला ३ ते ४ वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ चहा घेतात. चहा तर आपल्या जीवनातील इतका महत्वाचा भाग झाला की, त्या शिवाय आपण निवांत राहूच शकत नाही. भारतात सकाळी उठल्यावर अनेक जण चहाने दिवसाची सुरुवात करतात. पण चहा कॉफी आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही. अनेक डॉक्टर सुद्धा चहा कॉफी (Coffee) सोडण्याचा सल्ला देतात. पण चहा कॉफी सोडून दिवसाच्या सुरुवातीला काय प्यायचे हा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण सकाळी उठल्यावर चहा कॉफी नाही तर मॉर्निंग ड्रिंक तुम्ही घेऊ शकता. मॉर्निंग ड्रिंक तुमचे चयापचन संतुलित करण्यात फायदेशीर आहे. मॉर्निंग ड्रिंक (Morning drink) तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करते.

हळद आणि काळी मिरी (Turmeric and black pepper)
एक भांड्यात पाणी गरम करत ठेवा. पाणी गरम झाल्यावर ते कोमट करून घ्या. एक ग्लास कोमट पाण्यात हळद आणि काळी मिरी घाला. त्या पाण्यात मिक्स करा. सकाळी उठल्यानंतर रोज न चुकता हे पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीराचे चयापचय संतुलित राहील आणि त्यासोबत जास्तीचे फॅट्स देखील कमी होऊ शकतात.

ओवा आणि जिऱ्याचे पाणी (Owa and cumin water)
सकाळी उठल्यानंतर पाण्यामध्ये ओवा आणि जिरे घाला. गॅसवर मंद आचेवर पाणी उकळवत ठेवा. त्यानंतर उकळलेले पाणी स्वच्छ गाळून प्या. या पाण्यामुळे पचनाशी संबंधीत समस्या दूर होऊ शकतात. त्यासोबतच तुमचे वजन ही कमी होऊ शकते. हे ओवा आणि जिऱ्याचे पाणी रोज नियमित पिणे. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

लिंबू आणि पाणी (Lemon and water)
एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्या पाण्यात लिंबू पिळून घ्या. सकाळी उठल्यानंतर चहा कॉफीऐवजी हे लिंबू आणि पाणी प्या. जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही मध सुद्धा टाकू शकता. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. या पाण्याने चेहऱ्यावर चमक येते. हे तुमच्या आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर आहे.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा: 

घरच्या घरी Healthy oats आणि Honey पासून बनवा टेस्टी कुकीज…

घरच्या घरी Healthy oats आणि Honey पासून बनवा टेस्टी कुकीज…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss