spot_img
spot_img

Latest Posts

जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिणे शरीरासाठी ठरू शकते हानिकारक

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आरोग्यतज्ज्ञ अनेकदा पाणी पिण्याची शिफारस करतात. दिवसभर शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणं खूप गरजेचं आहे.

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आरोग्यतज्ज्ञ अनेकदा पाणी पिण्याची शिफारस करतात. दिवसभर शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणं खूप गरजेचं आहे. पण अशातच काहीजण पाणी पिताना त्यात लिंबाचा वापर करतात. लिंबाचा रस पिळलेलं पाणी पिण्यास खूप लोक पसंती दर्शवतात. लिंबू शरिरातील घाण काढण्याचं आणि शरीर डिटॉक्सिफाय (Detoxify) करण्याचं काम जरी करत असलं, तरी यासोबत ते चरबी जाळण्यातचं काम देखील करतं. यामुळे तुमची लठ्ठपणापासून सुटका तर होईलच. पण कोणत्याही गोष्टीचा अतिवापर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. लिंबू पाण्याचं अतिसेवन शरिरासाठी घातक ठरू शकतं. पण कस ते जाणून घेऊयात.

लिंबू पाणी फायदेशीर तितकेच घातक असते (Lemon water is as harmful as it is beneficial)

लिंबू पाणी हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स (Detox) करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होते. पण काही लोक खूप गडबडीत असतात आणि त्यांना सर्व गोष्टींचा परिणाम तात्काळ अनुभवायचा असतो. त्यामुळे काहीजण अति प्रमाणात लिंबू पाणी पितात आणि मग हे शरिरासाठी खूप घातक ठरू शकते.

किती ग्लास लिंबू पाणी पिणे योग्य (How many glasses of lemon water should you drink?)

लिंबू पाण्याचा शरीराला खूप प्रकारे फायदा होतो. पण जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिणं शरीरासाठी हानिकारक ही असू शकते. रोज केवळ एक ग्लास लिंबू पाणी पित असाल तर ते योग्य आहे. परंतु एक ग्लास पेक्षा जास्त ग्लास लिंबू पाणी पिणं टाळलं पाहिजे. लिंबू पाणी हे एक ग्लासाच्यावर प्यायचं नाही. त्याने शरीराला त्रास होतो. लिंबू पाण्याचे अतिसेवन हे आपल्या आरोग्यसाठी हानिकारक आहे.

जास्त लिंबू पाणी पिल्याने होणारे नुकसान (Damage caused by drinking too much lemon water)

पाणी पिताना लिंबाचा वापर करणारे खूप लोक आहेत. सकाळी उठताच लिंबाचा रस पिळून पाणी पिण्याची सवय अनेक लोकांना असते. परंतु दिवसभरात एका ग्लासापेक्षा जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिणं खूप आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया ही बिघडू शकते. त्यामुळे लिंबू पाण्याचा वापर नियंत्रित प्रमाणात करा. याच्या मदतीने तुम्ही शरीरात उद्भवणाऱ्या समस्यांपासून दूर राहू शकता, मात्र जास्त प्रमाणात लिंबू पाणी शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा: 

यंदा आपल्या लाडक्या बाप्पासाठी बनवा मुगाच्या डाळीचे चविष्ट मोदक

पोटाच्या उजव्या बाजूला खूप त्रास होतोयं का? तर हेही कारणे असू शकतात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss