spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

तूप खाताय आणि वजन वाढत चाललंय; तर जाणून घ्या सविस्तर माहिती

Does Having Ghee In Winter Cause Weight Gain : आयुर्वेदिक आहारात तुपाचे (Ghee) महत्वपूर्ण स्थान आहे. हिवाळ्यात तूप शरीराला उबदार ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. तूप गरम असल्यामुळे ते शरीराला अतिरिक्त उष्णता प्रदान करते. तूपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. यामध्ये असलेल्या फॅट्समुळे शरीराच्या मेटाबॉलिज्मला प्रोत्साहन मिळते आणि चयापचय प्रक्रिया सुधारतात. तूप स्नायू आणि जोडांच्या कार्यक्षमतेला मदत करते. पण काही लोक असं म्हणतात हिवाळ्यात तुपाचे सेवन केल्यानं वजन वाढू शकत. हे कितपत खाल्लं पाहिजे हे जाणून घेऊया.

तूप खाणं तब्येतीसाठी खूप गरजेचं असत. तूपात असलेल्या ओमेगा-3 फॅटी ऍसिड्समुळे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. हिवाळ्यात शरीराला बाह्य उबदारतेची आवश्यकता असते आणि तूप त्यासाठी एक नैसर्गिक तेलाचा उत्तम स्रोत आहे.यात ओमेनो ५ फॅटी एसिड्स असतात ज्यामुळे मेटाबॉलिझम वाढतो. त्याव्यतिरिक्त यात व्हिटामिन डी, ई, के यांसह एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे तब्येत सुधारते. तूपातील ट्रायप्टोफॅन शरीरात सेरोटोनिन तयार करण्यास मदत करते, जो मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि मूड सुधारण्यासाठी उपयोगी असतो.

एक्सपर्ट्स सांगतात कि एक चमचा तुपात १२० ते १३० कॅलरीज असतात आणि १४ ते १५ ग्राम फॅट्स असतात. तूप खाणे वजन वाढवण्याचे मुख्य कारण नाही, पण अति खाल्ल्यास ते अधिक कॅलोरीचे कारण बनते. म्हणून, तूपाचे सेवन संतुलित आणि नियमित प्रमाणातच करणे आवश्यक आहे. तुपामुळे आवश्यक असलेल्या पोषणतत्त्वांचा पुरवठा शरीराला होतो.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss