Saturday, June 3, 2023

Latest Posts

हॉटेलमध्ये Tandoor Roti खाताय? लगेचच थांबवा,आरोग्यावर होतो त्याचा मोठा दुष्परिणाम

आपण हॉटेलमध्ये खायला गेल्यावर तंदुरी रोटीवर हमखास ताव मारतो. तंदुरी रोटी ही हॉटेलमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी सर्वात लोकप्रिय खाद्य पदार्थ आहे.

आपण हॉटेलमध्ये खायला गेल्यावर तंदुरी रोटीवर हमखास ताव मारतो. तंदुरी रोटी ही हॉटेलमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी सर्वात लोकप्रिय खाद्य पदार्थ आहे. हॉटेलमध्ये जेवणारे बरेच जण विविध भाज्यांसोबत आणि चिकनसोबत तंदुरी रोटीच शक्यतो ऑर्डर करतात. तंदुरी रोटी हा रोटीचाच एक प्रकार असून त्यात कॅलरीज (Calories) आणि कार्बोहायड्रेट्सचे (Carbohydrates) चे प्रमाण प्रचंड असते. परंतु तंदुरी रोटी खायला अगदी चविष्ट आणि रुचकर असते.कोणताही सण असो किंवा कोणाचे लग्न असो मेनू मध्ये तंदुरी रोटी असतेच. तंदूरी रोटी कढई पनीर, डाळ, करी या सोबत खायला अगदी छान लागते.तंदुरी रोटी तंदूर मध्ये भाजून तयार केली जाते. तसेच तंदुरी रोटी खाताना कोळशाच्या येणारा सुगंध याची टेस्ट वाढवतो. म्हणूनच हॉटेल मध्ये गेल्यावर प्रत्येकजण तंदुरी रोटी आवडीने खातो. परंतु हीच तंदुरी रोटी आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असते. चला तर मग जाणून घेऊयात.

तंदुरी रोटी खाल्यान्ने शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात ते जाणून घेऊया :

  • हॉटेल मध्ये खाल्ली जाणारी तंदुरी रोटी आरोग्यासाठी वाईट असते. तसेच त्यात प्रचंड प्रमाणात लोणी आणि अस्वास्थ्यकर चरबी असते.आपल्या कडे बऱ्याचदा हॉटेल मधून किंवा रेस्टोरंटमधूनच जेवण ऑर्डर केले जाते. त्यामुळे प्रचंड प्रमाणात लोणी आणि अस्वास्थ्यकर चरबी असलेले हे खाद्य खाणे आपल्या शरीरासाठी चांगले नसते.
  • तंदूरी रोटी पांढर्‍या पिठापासून बनविली जाते, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पांढरे पीठ आतड्याच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याचे सतत सेवन केल्याने इरिटेबल बोवेल सिंड्रोम (Irritable Bowel Syndrome),दीर्घकालीन बद्धकोष्ठता (Constipation), पचन समस्या आणि कोलेस्ट्रॉल (Cholesterol) यांसारख्या अनेक आजारांचा धोका स्वतःहून ओढवून घेतो.
  • हॉटेल मध्ये तंदुरी रोटी कोळश्यावर किंवा लाकडावर असलेल्या तंदूर वर तयार करतात. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी च्या संशोधनानूसार कोळसा, लाकूड किंवा कोळशात शिजवलेले अन्न खाल्ल्याने केवळ वायू प्रदूषण होत नाही तर हृदयविकाराचा धोकाही वाढतो.
  • एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक स्वयंपाकासाठी लाकूड किंवा कोळसा वापरतात त्यांना हृदयविकाराचा झटका, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकमुळे मृत्यू होण्याचा धोका 12 टक्के जास्त असतो.

हे ही वाचा : 

शरद पवारांनी सरकारवर सोडले खडेबोल

काही दिवसातच पाहा ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’, सिरीजचा प्रोमो रिलीज

सुषमा अंधारेंच्या सभेवरून नेमकं घडला काय प्रकार ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss