Friday, December 1, 2023

Latest Posts

यंदाच्या दिवाळीत घरातील बाल्कनी सजवायची आहे,तर जाणून घ्या ‘या’ टिप्स

सध्या ब्लॉक सिस्टिमध्ये बाल्कनी सजवली जाते, दिव्यांनी उजळल्या शिवाय घरात दिवाळी आहे असे वाटत नाही. दिवाळीला लायटिंगशिवाय घर सजवणे केवळ अश्यक्यच. तूम्ही बाल्कनीसाठी वेगवेगळ्या आकारातील लायटींगच्या माळा, फुलांच्या माळा यांचा वापर करू शकता.

सणं सुरु झाले की धावपळ असते ती घर साफ करणं,जुन्या वस्तू टाकून नव्या वस्तू घरी आणनं ही लगबग तर चालूच असते,दरम्यान आता गणेशोत्सव झाला नुकतीच आता नवरात्र देखील संपली आहे,आता आतुरता आहे ती दिवाळी या सणाची.हा सर्वात मोठा आणि वर्षातला शेवटचा सण असतो.या सणाची लहान मुलापासून अगदी ज्येष्ठा पर्यंत सगळेच वाट पाहत असतात,आणि हा सण अगदी आनंदाने कुटुंबियांसोबत साजरा करत असतात. पण दिवाळीत सगळ्यात महत्तवाचं असतं ते म्हणजे घराची साफसफाई प्रत्येक जण आपल्या घराला हटके पद्धतीने कसं सजवता येईल, याच्या तयारीत लागलेला दिसून येतो. आपआपल्या आवडीनुसार घराच्या सजावटीसाठी प्रत्येकजण काही ना काही गोष्टी करण्यात व्यस्त असतो. एकदम मोठं काम निघालं तर मग खर्चाचा आकडा वरची पातळी गाठतो. तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, अतिशय कमी खर्चाच पण हटके पद्धतीने घराची सजावट करण्यासाठी भन्नाट आयडियाज.

पूर्वी घरी मोठ्या अंगणात आकाश कंदील, दिवे आणि रांगोळी याने दिवाळी घर सजवली जायची.पण, आता फ्लॅट सिस्टीममध्ये ती जागा बाल्कनीने घेतली आहे.बाल्कनी ही लहानांसाठी खेळण्याची, एक्स्ट्रा सामान ठेवण्याची, ऑफिसवरून आल्यावर निवांत वेळ घालवण्याची हक्काची जागा बनली आहे. सगळे सण समारंभ बाल्कनीतच पार पडतात. त्यामुळे बाल्कनी नेहमी स्वच्छ आणि सुशोभीत ठेवावी. दिवाळी सुद्धा बाल्कनीतच साजरी केली जाते. त्यामुळे दिवाळासाठी काय खास डेकोरेशन करता येईल हे जाणुन घेऊयात

लाइटिंगने उजळेल बाल्कनी

सध्या ब्लॉक सिस्टिमध्ये बाल्कनी सजवली जाते, दिव्यांनी उजळल्या शिवाय घरात दिवाळी आहे असे वाटत नाही. दिवाळीला लायटिंगशिवाय घर सजवणे केवळ अश्यक्यच. तूम्ही बाल्कनीसाठी वेगवेगळ्या आकारातील लायटींगच्या माळा, फुलांच्या माळा यांचा वापर करू शकता. तसेच, बाल्कनीत असलेल्या कुंड्यांवर, झाडांवर तूम्ही लायटींग करू शकता. लायटींगमध्ये गोल्डन, सिल्वर आणि कॉपर कलर्सच्या लाइट्सचा वापर करता येऊ शकतो.वेगवेगळ्या प्रकारचे लायटींग तुम्ही बाल्कनी मध्ये सोडू ही शकता यांने बाल्कनीला सुंदर लूक देखील येईल

आकर्षक रंग, स्टीकर्स

दिवाळीत बाल्कनी सजवताना भिंती आकर्षक रंगात रंगवणे हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. भिंतीवर लावण्यासाठी वेगवेगळे स्टिकरही मिळतात. बाल्कनीत तुम्हाला हवे असल्यास वॉल हँगिंग्ज, एम्पाना आर्ट, रंगीबेरंगी पेंटिंग आणि मंडला पेंटिंग करून भिंती सजवता येतात. तसेच, पेंटिंग हायलाइट करण्यासाठी तुम्ही त्याभोवती लाईट्सचाही वापर करू शकता.दिव्यांचे पेंटिंग ही तुम्ही भिंतींवर करु शकता.

सिटींग एरिया करा बेस्ट

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पाहुणे घरी येतात. त्यांना प्रसन्न आणि आरामदायक वाटेल अशी सिटींग अरेंजमेंट करावी. त्यासाठी टेबल, खुर्ची, त्यांचे कव्हर एकाच रंगाचे असावेत. बाल्कनीच्या भिंती ज्या रंगाच्या असतील त्याला क्रॉस उशांचे, कोचवरील कव्हर असावेत. टेबल खुर्ची ठेवलेल्या मागील भिंत फुलांच्या माळांनी सजवावी.

टेबल सजवा

टेबल सजवण्यासाठी एका काचेच्या भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या ठेवा. त्यावर तरंगत्या मेनबत्त्या ठेवा. अशीच सजावट तूम्ही बाल्कनीच्या कोपऱ्यातही करू शकता. तसेच दारातील रांगोळीजवळही अशी सजावट आकर्षक दिसेल.फुलांचा वापर तुम्ही दरवाज्यात रांगोळीसाठी ही करु शकता ज्याने तुम्हचा दरवाज्याला ही सुंदर लूक येईल.

हे ही वाचा : 

माणसाची अजब करामत! एक, दोन नव्हे तर चोरल्या तब्बल सहा रिक्षा, कारण ऐकून व्हाल थक्क

कांद्याला दराची ‘झळाळी’, शेतकरी दु:खी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

 

Latest Posts

Don't Miss