spot_img
spot_img

Latest Posts

आहारात मीठाचा अतिवापर केल्यास उदभवू शकतो हृदयविकाराचा धोका

दिवसेदिवस बदललेली जीवनशैली, धावपळीचे जीवन जेवण्याची वेळ बदलत असल्याने हल्ली स्वतःकडे दुर्लक्ष होतेच.

दिवसेदिवस बदललेली जीवनशैली, धावपळीचे जीवन जेवण्याची वेळ बदलत असल्याने हल्ली स्वतःकडे दुर्लक्ष होतेच. जेवणाला चवच नाही, असा काही जणांचा समज असतो. त्या नादात मिठाचा अतीवापर करून स्वतःची आणि कुटूंबाच्या आरोग्याला हानी करू शकतो. जर तुम्हाला आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर मीठाचा अतिवापर करू नये. आहारात मीठाचा समावेश न केल्यास किंवा कमी प्रमाणात मीठाचं सेवन केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर हृदय स्ट्रोक आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजाराचा धोका कमी होऊ शकतो. जे लोक नेहमी त्यांच्या अन्नात मिठाचा अतिवापर करतात किंवा मीठ खातात त्यांना एट्रियल फायब्रिलेशनची किंवा ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. उलट जे आपल्या अन्नात मिठाचा वापर करत नाही किंवा कमी प्रमाणात मीठ वापरतात त्यांच्यात हृदयविकाराचा झटकायेण्याचा संभव कमी असतो.

एट्रियन फायब्रेशन ही ठोके जलद होण्याची एक प्रक्रिया आहे , त्यामुळे हृदयात रक्ताच्या गाठी देखील होऊ शकतात. त्यामुळे शरीरात हृदयाशी संबंधित इतर आजाराचा धोका वाढतो. क्यूगपूक नॅशनल विद्यापीठाने हॉस्पिटलचे प्रमुख संशोधक युग जग पार्क म्हणाले की, ‘आमच्या अभ्यासातून असे दिसून आले की, पदाथामध्ये मिठाचे सेवन कमी करणार्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो.’

मिठाचा अतिवापर केल्यास हृदयविकाराचा झटका कमी होतो. जास्त मीठ खाल्यानी उच्च रक्तदाबासह स्टोक चा आजारही उद्भवू शकतात. हृदयविकाराचा आणि स्टोरक होण्याचा धोका वाढल्या बरोबर उच्च रक्तदाबामुळे तुमच्या हृदयाचे नुकसान होऊ शकते. एट्रियन फायब्रेशन होऊ शकते,’ असे ब्रिटिश हार्ट फाउंडेशन चे प्रोफेसर म्हणाले.

मीठातील सोडियम हे एक आवश्यक घटक आहे. परंतु जास्त मीठ खाल्याने ते आहार आणि पोषक संबंधित मृत्यूसाठी कारणीभूत ठरते.जास्त मीठ खाल्याने मृत्यूचाही धोका उध्दभवतो. मार्च सुरुवातील जागतिक आरोग्य संघटनेने देखील मीठाचं सेवन कमी करण्याचं आवाहन केले आहे. मिठाचाच वापर कमी केल्यास किंवा मिठाचा वापर कमी केल्यास सात दशलक्ष जीव वाचू शकतात.

सोडियममुळे शरीरातील कॅल्शियमवर परिणाम होतो. शरीरात सोडियमचं प्रमाण वाढल्याने रक्तावाहिन्यांतून जे रक्त वाहत असतं, त्यावर खूप प्रेशर येतं. याचा परिणाम हृदयाच्या कार्यावर होतो. तसेच रक्तवाहिन्यांवर आलेल्या दाबामुळे रक्तदाबदेखील वाढतो. त्याचाच परिणाम किडनीवरही होतो.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

Latest Posts

Don't Miss