Friday, April 26, 2024

Latest Posts

दुपारची झोप येतेय? हे उपाय नक्की ट्राय करा

रोजच्या जीवनामध्ये आपल्या शरीराला झोप लागणे फार महत्वाचे असते. आपण सकाळी कामावर जातो आणि ऑफिसला जाण्याचा सकाळचा उत्साह हा वेगळाच असतो.

रोजच्या जीवनामध्ये आपल्या शरीराला झोप लागणे फार महत्वाचे असते. आपण सकाळी कामावर जातो आणि ऑफिसला जाण्याचा सकाळचा उत्साह हा वेगळाच असतो. उन्हाळा असल्यामुळे जशी दुपार होत जाते तसा हा उत्साह थोडा फार तरी कमी होतोच. याचे कारण दुपारचे जेवण देखील असू शकते. कोरोनाच्या काळामध्ये अनेकांना वर्क फ्रॉम होम दिले होते. घरी काम करण्याची सवय अनेकांची सुटली नाही. त्यामुळे कामामध्ये दुपारचा वेळ हा कंटाळवाणा असतो. बऱ्याच जणांना सवय लागलेली असते रात्री जगायची आणि दुपारी झोप काढायची. जर आपण दुपारच्या वेळेत ऑफिसमध्ये झोप आल्यावर वाईट इम्प्रेशन पडते. आज आम्ही तुम्हाला दुपारच्या झोपेची ही समस्या सोडवण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. या उपायांमुळे तुमची कदाचित दुपारची झोप उडेल.

जर आपल्याला दुपारच्या झोपेमधून सुटला मिळवायची असेल तर सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजेच झोपणे. ही दुपारची झोप आपल्याला आठ तासांची घायची नाहीतर फक्त २० मिनिटांची घ्यायची आहे. या प्रकारच्या झोपेला पॉवर नॅप असे म्हणतात. अशा प्रकारची झोप म्हणजेच पॉवर नॅपमुळे झोप तर उडतेच यासह मेंदूला देखील आराम करण्यासाठी आवश्यक वेळ तेवढा मिळतो.

यावर दुसरा उपाय म्हणजेच आपल्याला दुपारच्या झोपेतून सुटका हवी असल्यास यावर सर्वात सोपा उपाय म्हणजेच स्ट्रॉंग कोफी. स्ट्रॉंग कॉफीमध्ये असलेले कॅफिन मेंदूची क्रिया आणि मज्जासंस्था सक्रिय करण्यास मदत करते. ज्यामुळे आपली झोप उडते. दुपारचे जेवण केल्यास लगेचच या उपायाचा वापर करू नका ही स्ट्रॉंग कॉफी काही वेळेनंतर घ्या.

या समस्येवर शेवटचा उपाय म्हणजेच तुमचे तोंड पाण्याने धुवा. आपले तोंड थंड पाण्याने धुतल्यास आपल्या शरीराला आराम आणण्यास मदत करते. स्वतःचा चेहरा धुतल्यानंतर पंख्याजवळ जाऊन बसा त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान सामान्य होईल आणि तुमची झोप देखील उडेल.

हे ही वाचा : 

शेवगाव, सातारा येथील हिंसाचाराच्या घटनेमुळे पोलिसांना केले अलर्ट

देवेंद्र फडणवीसांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणूका होतील याबाबतचे संकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss