आपल्यातील काही जणांना काही वेळा खूप घाम येतो. जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या हाताला स्पर्श करतो तेव्हा घाम आल्यामुळे हात खूप थंड पडतात. पण हाताला घाम येणं ही काही सामान्य गोष्ट नाही. यामागे काही कारण देखील असू शकतात. हाताला येणाऱ्या सततच्या घामाकडे दुर्लक्ष्य केल्यामुळे पुढे जाऊन आल्याला त्रास होऊ शकतो. या आजाराला हायपरहाइड्रोसिस (Hyperhidrosis) म्हणतात. हा आजार शारीरिक कमतरतेमुळे होतो. तुमच्या शरीरात जर एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तर अशा वेळी हा आजार होऊ शकतो.
हाताला घाम येण्या मागचे मोठे कारण म्हणजे अतिक्रियाशील नसा. अतिक्रियाशील नसा म्हणजे हे व्हिटॅमिन डी (Vitamin D) आणि व्हिटॅमिन बी १२ (Vitamin B12) च्या कमतरतेमुळे असू शकते. त्यामुळे घाम स्राव करणाऱ्या ग्रंथी खूप सक्रिय होतात आणि हाताला घाम येतो. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आणि मज्जातंतूंच्या कार्यामुळे होऊ शकतो. जर तुम्हला सामान्य किंवा कमी तापमानामध्ये जास्त प्रमाणात घाम येत असेल तर याचा संबंध ‘हायपरहाइड्रोसिसशी’ आहे. हा आजार असणाऱ्या लोकांच्या ग्रंथी अधिक सक्रिय असतात. त्यामुळे खूप घाम येऊ लागतो. आशय लोकांच्या हात, पाय आणि काखेत भरपूर घाम येऊ लागतो. हायपरहाइड्रोसिस आजाराचे दोन प्रकार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक (primary and secondary). प्राथमिक हायपरहाइड्रोसिसमध्ये घाम येण्याची अनेक गंभीर कारणे असतात तर माध्यमिक हायपरहाइड्रोसिस ग्रस्त रुग्ण इतर अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकतात. केंड्री हायपरहाइड्रोसिस(Kendri hyperhidrosis) देखील हाय ब्लड शुगर, लो ब्लड शुगर, हायपरथायरॉईडीझम (Hyperthyroidism) यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.
एखाद्या व्यक्तीच्या घामाच्या ग्रंथी सक्रिय होतात त्याला हायपरहाइड्रोसिस होतो. अति धूम्रपान, तणाव, गर्भधारणा किंवा रजोनिवृत्तीमुळे एखाद्या व्यक्तीला हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच मधुमेह, रजोनिवृत्ती, थायरॉईड, कर्करोग आणि लठ्ठपणा यासारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना जास्त घाम येण्याची शक्यता असते. जास्त घाम आल्यामुळे शरीराला दुर्गंधी येते त्यामुळे सुगंधी परफ्युमचा वापर केला जातो. अशा लोकांना काहीवेळा सार्वजनिक ठिकाणी लाज वाटते. वारंवार पाण्यात हात घाला. तुम्हाला काही काळासाठी आराम मिळेल.
या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.
हे ही वाचा:
मराठवाड्याच्या दुष्काळ परिस्थितीवर जयंत पाटील म्हणाले …
बाप्पासाठी बनवा खास रव्याचे मोदक