गड्या, मुंबईपेक्षा गाव बरा असं खूप वेळा ऐकायला मिळतं. खरंतर गावात जीवन साधं, शांत आणि सौम्य असतं, पण खिसा रिकामा असला की तेथेही ताणतणाव वाढतो. गावात छोट्या गोष्टींमध्ये सुख असलं तरी, आर्थिक समृद्धी आणि चांगल्या करिअरसाठी मुंबईची महत्त्वपूर्णता नाकारता येत नाही. मुंबई ही एक अशी नगरी आहे जिथे तुम्ही तुमच्या मेहनतीच्या आधारावर मोठ्या संधी साधू शकता. याच्या दुसऱ्या बाजूला, मुंबईत राहणे महाग, कणखर आणि अत्यंत स्पर्धात्मक असू शकते. प्रत्येकाला तिथे थोडे थोडे संघर्ष करावा लागतो, मात्र तेच संघर्ष अनेकांना मोठ्या यशाकडे नेऊन पोचवतात. काही लोक त्यांचे मोलाचे कुटुंब आणि घर सोडून मुंबईत येतात, कारण याच शहरात त्यांना त्यांच्या जीवनाचे गोल साधता येतात.अर्थात, गावात राहूनही जास्त खर्च न करता साधं जीवन जगता येते, पण चांगल्या कमाईसाठी, उच्च शिक्षणासाठी, किंवा मोठ्या करिअरच्या संधींसाठी मुंबईत आलं पाहिजे, हेही तितकंच महत्वाचं आहे.
मुंबईत असलेली गती, विविध क्षेत्रातील संधी, आणि आर्थिक समृद्धी ही तुम्हाला ग्रामीण भागांमध्ये शोधायला फार कठीण असते. पण एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या आणि कोट्यवधींचं पॅकेज असणाऱ्या तरुणाने मुंबईसोडून गावाकडचा रस्ता धरला आणि वेगळाच पायंडा घातला आहे. मुंबईला ‘रामराम’ करुन पाच वर्ष गावात राहून काम केल्यानंतरचा अनुभव सुमीत अग्रवाल नावाच्या तरुणानं त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलवर शेअर केला आहे.
मुंबई सोडण्याचा निर्णय आपल्यासाठी कसा फायदेशीर ठरला आणि त्यामागची पाच कारणं सुमीत याने सांगितली आहेत. सुमीत अग्रवाल हा मूळचा जमशेदपूर इथला पण करिअरसाठी मुंबईत आला. इथल्या बड्या कंपनीत उच्च पदावर नोकरीही करत होता. पण आपल्या लाइफस्टाइलमध्ये काही सुधारणा करण्यासाठी त्याने ५ वर्षांपूर्वी मुंबई सोडून आपल्य मूळ ठिकाणी म्हणजे जमशेदपूरला जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला.
मुंबईसारखं सोशल लाइफ गावी मिळेल का?, सुट्टीच्या दिवशी तिथे काय करणार?, कामाच्या ठिकाणचं वातावरण कसं असेल? असे अनेक प्रश्न मुंबई सोडताना पडले होते असं सुमीत सांगतो. पण आता गावात राहून पाच वर्ष झाली आणि आपला निर्णय कसा अचूक ठरला हे जाणवत असल्याचं सुमीतनं म्हटलं आहे.
मुंबईसोडून गावातून काम करण्यामागची ५ कारणं…
१. ट्राफिकची कटकट नाही
मला माझ्या दिवसातील २०-२५ टक्के वेळ आता ट्रॅफिकमध्ये घालवावा लागत नाही. माझे ऑफिस १४ किमी अंतरावर आहे, जिथे पोहोचण्यासाठी मला फक्त १५ मिनिटे लागतात. तसंच ऑफिसमध्ये पोहोचल्यावर चिडचिड करत नाही हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे, असं सुमीतनं म्हटलं आहे.
२. राहणीमानाचा खर्च कमी:
मोठ्या शहरांच्या तुलनेत राहणीमानावर कमी खर्च करावा लागतो असंही सुमीत म्हटलं आहे. त्यामुळे मासिक खर्च लक्षणीयरीत्या कमी झाल्याचा मोठा फायदा झाल्याचं सुमीत सांगतो.
३. कमी किमतीत सुविधा:
फूड डिलिव्हरीपासून ते ई-कॉमर्सपर्यंत, सुमीत शहरी जीवनातील सर्व सुविधांचा आनंद गावातही घेतो. गावात सर्व सुविधा सहज उपलब्ध आहेत. फूड डिलिव्हरी असो, ई-कॉमर्स असो, कॅब सर्व्हिस असतो किंवा मग मल्टिप्लेक्स असो. सगळं इथंही आहे.
४. सार्वजनिक जागांवर शांतता:
मुंबईच्या तुलनेत गावी खूपच कमी गर्दी आहे. मुंबईत तर गर्दीची भीती बाळगून सुट्टीच्या दिवशी बाहेर जायला मला आवडत नव्हते. पण इथे तसं नाही.
५. आरोग्य आणि खेळांसाठी अधिक वेळ:
मुंबईतील धकाधकीच्या वेळापत्रकाच्या तुलनेत गावातून काम करताना वेळेचे बचत होत असल्याने आरोग्यासाठी आणि खेळांसाठी अधिक वेळ देऊ शकतोय, असंही सुमीतनं म्हटलं आहे.
आपल्या निर्णयावर भाष्य करताना सुमीतने इतरांनाही एक प्रश्न विचारला आहे. तो म्हणतो, पाच वर्षांपूर्वी, मला खरोखर खात्री नव्हती की एका लहान शहरातील जीवन कसं असेल. पण ते इतकं वाईट नाहीये. जर तुम्हाला पर्याय मिळाला तर तुम्ही टियर २ किंवा टियर ३ शहरात शिफ्ट होऊ शकता का?
सुमित अग्रवालच्या अनुभवातून हे सिद्ध होते की, जीवनाचा आनंद साधा असावा लागतो, आणि जर तुम्ही त्याला योग्य दृषटिकोनातून पहात असाल, तर मोठ्या शहराच्या कटकटींपेक्षा छोट्या ठिकाणीही जीवन सुंदर होऊ शकते. त्यामुळे, तुमच्या गरजा, ध्येय, आणि परिस्थिती यानुसार निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. काही लोकांसाठी मुंबईचे मोठे करिअर आणि जीवनशैली आकर्षक असू शकते, तर काहींसाठी लहान शहरातील साधेपणानेही समाधान मिळवता येऊ शकतं.
हे ही वाचा :
घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत