Friday, December 1, 2023

Latest Posts

हिवाळ्यात ‘लसूण’ वाढवेल तुमची रोगप्रतिकारशक्ती

लसणामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते

हिवाळ्यात लसणाचे सेवन करणे हे खूप फायदेशीर मानले जाते. लसूणमध्ये असे काही गुणधर्म असतात जे सर्दी आणि फ्लू (Flu) यांच्यासारख्या आजारांना लढण्यास प्रतिबंध करतात. हिवाळ्याच्या दिवसात दररोज एक लसणाची पाकळी खाल्ल्याने शरीराचे अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव होतो आणि प्रतिकारशक्ती देखील वाढते. याशिवाय हृदयाच्या आरोग्यासाठी देखील लसणाच्या पाकळ्या ह्या अत्यंत गुणकारी मानल्या जातात. लसूण खाल्ल्याने शरीरातील अँटीऑक्सिडंट्स (antioxidant) वाढतात जे पेशींचं नुकसान होण्यापासून वाचवतात. तसेच, रक्त पातळ करण्यात देखील मदत करतं. ज्यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात, त्यामुळे हिवाळ्यात लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात व त्यासोबतच अजून नेमके कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

थंडीपासून आराम मिळतो-

लसणात उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीराचे तापमान वाढायला मदत होते तसेच, शरीरातील थंडी देखील कमी होते, लसणाच्या सेवनाने रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे हात आणि पायांना उबदारपणा येतो आणि थंडीपासून देखील आराम मिळतो. हिवाळ्यात कच्चा लसूण किंवा स्वयंपाकात लसणाचा वापर केल्याने थंडीपासून आराम मिळतो तसेच सर्दीसाठी देखील लसूण हा खूप उपयोगी ठरतो.

सर्दी-खोकल्यामध्ये फायदेशीर-

हिवाळ्याच्या दिवसात सर्दी खोकल्यासारख्या समस्या उद्भवतात. या बदलत्या हवामानामुळे मुलं आणि प्रौढ दोघांना संसर्ग होण्याचा शक्यता असते. पण जर तुम्ही आहारात नियमितपणे लसणाचे सेवन केले तर या सगळ्या समस्या टाळण्यास मदत होते. नैसर्गिकरित्या लसणात अँटीवायरल (antiviral)आणि अँटीबॅक्टेरियल (antibacterial) गुणधर्म असतात. ज्यामुळे सर्दी आणि खोकला या समस्यांपासून आराम मिळतो.

लसणामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते-

हिवाळ्याच्या दिवसात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते तसेच या ऋतूत व्हायरस (viruses)आणि बॅक्टरीया (bacteria) सक्रिय होतात, ज्यामुळे खोकला, सर्दी, ताप यासारख्या समस्या उद्भवतात. अशावेळी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे अतिशय महत्त्वाचे असते. लसणामध्ये अॅलिसिन (allicin) नावाचे एक संयुग असते ज्यामध्ये अँटीव्हायरल(antiviral), अँटीबॅक्टेरियल (antibacterial), आणि इम्युनोमोड्युलेटरी(immunomodulatory) गुणधर्म असतात जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

हे ही वाचा : 

LIC Jeevan Tarun Policy: एलआयसी जीवन तरुण पॉलिसी म्हणजे काय?

CYBER SECURITY: नोकरीच्या संधी उपलब्ध, ‘इतके’ मिळू शकते PACKAGE

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss