Tuesday, June 6, 2023

Latest Posts

चष्मा सारखा सारखा घाण होतोय ? वापरा ‘या’ टिप्स, दिसेल अगदी स्पष्ट….

अनेक लोकांना डोळयांच्या समस्या असतात. काहींना आपल्या डोळ्यांनी जवळचे दिसत नाही तर काहींना दूरचे दिसत नाही. त्यामुळे लोक चष्म्याचा वापर करतात. काही लोकांना चष्म्याशिवाय अजिबातच दिसत नाही.

अनेक लोकांना डोळयांच्या समस्या असतात. काहींना आपल्या डोळ्यांनी जवळचे दिसत नाही तर काहींना दूरचे दिसत नाही. त्यामुळे लोक चष्म्याचा वापर करतात. काही लोकांना चष्म्याशिवाय अजिबातच दिसत नाही. त्यामुळे त्यांना सतत चष्मा लावावा लागतो. परंतु अनेकांना चष्मा स्वच्छ व साफ करण्याची व्यवस्थित पद्धत माहित नसते व त्यामुळे चष्म्याच्या काचेवर व लेन्सवर ओरखडे पडतात. अशा वेळेस अनेकदा नवीन चष्मा घ्यावा लागतो. नवीन चष्मा हा कमी किंवा जास्त दरात मिळत असला तरी आपला चष्मा खराब झाला की नवीन चष्मा हा घ्यावाच लागतो.

सध्याच्या काळात प्रत्येकजण मोबाईल, टीव्ही आणि कम्प्युटर तसेच लॅपटॉपचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. शास्त्रज्ञाच्या मते १०० पैकी ६० जणांना चष्मा हमखास असतोच. अलीकडच्या काळात लहांनापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचाच स्क्रीन टाइम वाढला आहे. स्क्रीन टाईम वाढल्याने अनेकांना डोळ्यावर चष्मा घालण्याची वेळ आली आहे. चष्मा म्हंटल कि ते सांभाळायची जबाबदारी आलीच. आपला चष्मा साफ आणि स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. व त्याचा सांभाळ करणं हे मोठ्या जबाबदारीचे काम आहे. त्यामुळेच चष्मा साफ करण्याच्या काही सोप्या पद्धती आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

चष्म्यावरील धूळ स्वच्छ करण्यासाठी पुढील पद्धत वापरावी –

चष्मा पुसण्यासाठी ग्लास लिक्विड असणे गरजेचे नाही. पाण्याच्या काही थेंबांनी देखील चष्मा साफ होऊ शकतो. चष्म्यावरील धूळ काढण्यासाठी चष्मा नळाखाली धुवून चष्म्याची फ्रेम स्वच्छ करावी. यामुळे चष्म्यावरील डाग, चिकटपणा आणि बॅक्टेरिया (Bacteria) निघून जाण्यास मदत होईल. तसेच चष्मा नेहमी सोबत मिळालेल्या कापडानेच पुसावा, चष्मा पुसण्यासाठी इतर कोणते ही कापड वापरू नये.

चष्मा नेमका कसा स्वच्छ करावा ?

चष्मा नियमित मायक्रोफायबर कापडाने कोरडा करावा – मायक्रोफायबर कापड हे लिंट फ्री असते, यामुळे मायक्रोफायबर पुसताना लेन्सवर किंवा काचेवर स्क्रॅच येत नाहीत. यामुळे स्वच्छ करण्यासाठी चष्मा हलक्या साबणाने धुवून ते पुसण्यासाठी मायक्रोफायबर कापडाचा वापर करावा.

लिक्विड सोपचा वापर करावा – चष्मा स्वच्छ करण्यासाठी लिक्विड सोप हे उत्तम पर्याय आहे. चष्म्यावरची घाण काढण्यासाठी लिक्विड सोपने पुसुन तसेच मइक्रोफायबर कपडा ओला करून चष्मा पुसून घावे. चष्मा धुण्यासाठी कोमट पाणी वापरावे गरम पाणी वापरण्याचे टाळावे. यामुळे लेन्सवरील किंवा काचेवरील कोटिंग खराब होण्याची भीती असते.

सॅनिटायजरचा वापर करावा – दिवसातून काही वेळा चष्मा सॅनिटायजरने पुसावा. परंतु चष्मा सॅनिटाइजरने पुसताना चष्म्यावर जास्तवेळ सॅनिटाइजर टाकून ठेवू नका. यामुळे चष्म्याच्या लेन्सवर किंवा काचे वर डाग पडू शकतात.

चष्मा स्क्रॅचमुक्त कसा ठेवावा – चष्मा स्क्रॅचमुक्त राहण्यासाठी जेव्हा गरज नसेल तेव्हा सोबत दिलेल्या कव्हर मध्ये ठेवावा. चष्मा वापरून झाल्यानंतर कोठेही ही ठेऊ नये. अडचणीच्या जागेवर तर चष्मा मुळीच ठेवू नये. दिवसातून अनेकदा चष्मा लेखात नमूद केलेल्या पद्धतीने स्वच्छ व साफ ठेवावा.

हे ही वाचा:

कंगनाने घेतली शॉर्ट घालून मंदिरात गेलेल्या मुलीची शाळा

बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या अकृषिक परवानगीची आवश्यकता नाही, राधाकृष्ण विखे पाटील

MI vs GT, फायनलचे तिकीट कोणाला मिळणार? मुंबई की गुजरात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss