Vodafone Idea नं मंगळवारी आपल्या 5G सर्व्हिसच्या व्यावसायिक रोलआऊटची घोषणा केली असून टेलिकॉम कंपनीनं सांगितलं की पुढील महिन्यात म्हणजे मार्च २०२५ मध्ये सर्वप्रथम मुंबईत 5G सर्व्हिस लाँच केली जाईल. कंपनीने मुंबईत 5G चाचण्या सुरू केल्या आहेत. ज्यामुळे निवडक ग्राहकांना अमर्यादित डेटा मिळत आहे. विशेष म्हणजे जिओ आणि एअरटेलच्या 5G लाँच नंतर तब्बल दोन वर्षांनी डिसेंबर २०२४ मध्ये Vi नं पहिल्यांदा आपली 5G सेवा देशातील १९ सर्कल्समध्ये लाँच केली होती, परंतु तेव्हा ही सेवा व्यावसायिकरित्या रोलआऊट करण्यात आली नव्हती.
Vi च्या तिसर्या तिमाहीच्या आर्थिक वर्ष २०२५ च्या अहवालानंतर ही माहिती समोर आली आहे. मुंबईत मार्च २०२५ पर्यंत व्यावसायिक 5G लाँच करण्याचं प्लानिंगत कंपनीचं होतं. त्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये दिल्ली, बंगळुरू, चंदीगड आणि पटना येथे त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. मुंबईतील vi युजर्सनी 5G ॲक्टिव्हेशन मेसेज इत्यादींद्वारे खुलासा करत कंपनीने या 5G सेवा सुरु केली आहे. काही चाचण्यांनंतर ही सेवा प्रत्येकासाठी सुरु केली जाऊ शकते. कंपनी ग्राहकांना अमर्यादित डेटा देखील देत आहे, जेणेकरून या सेवेची योग्य चाचणी घेता येईल. आता ही सेवा सर्वांसाठी कधी उपलब्ध होणार याची प्रतीक्षा आहे.
5G रोलआऊट व्यतिरिक्त कंपनीनं गेल्या नऊ महिन्यात 4G पॉप्युलेशन कव्हेरजमध्ये झालेल्या वाढीकडे देखील लक्ष वेधले. कंपनीनं दावा केला आहे मार्च २०२४ मध्ये त्यांनी १.०३ बिलियन लोकसंख्या कव्हर केली होती, जी डिसेंबर २०२४ पर्यंत १.०७ बिलियन पर्यंत पोहचली. तसेच कंपनीचे 4G सब्सक्रायबर देखील गेल्या तिमाहीत 125.6 मिलियनवरून 126 मिलियनवर पोहचले आहेत.
Vi युजर्ससाठी खूशखबर
युजर्सना आलेल्य मेसेजमध्ये असं म्हटलं आहे की, “अभिनंदन! तुमच्या नंबरवर Vi 5G सेवा अॅक्टिव्ह केली आहे. २९९ रुपये किंवा त्यावरील अनलिमिटेड पॅकसहमअमर्यादित 5G डेटा ऑफरचा आनंद घ्या.”
हे ही वाचा:
Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन
Follow Us