Saturday, June 3, 2023

Latest Posts

उन्हाळ्यात चेहरावर टॅनिंग आलंय? या तीन गोष्टींचा वापर नक्की करा

चेहरा डी-टॅन करण्यासाठी कोणत्याही पार्लरची गरज नाही. डीआयवाय उपाय करून होईल तुमचे काम सोपे. बदलत्या ऋतूनुसार आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

चेहरा डी-टॅन करण्यासाठी कोणत्याही पार्लरची गरज नाही. डीआयवाय उपाय करून होईल तुमचे काम सोपे. बदलत्या ऋतूनुसार आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं गरजेचं आहे. थंडीत त्वचा कोरडी होते आणि उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी पडू लागते. थंडीत त्वचेवर मॉइश्यारायझर लावून आपण काळजी घेतो पण उन्हाळ्यात त्वचा काळी पडू लागल्यावर आपण महागडे प्रॉडक्ट्स, क्रिम किंवा फेसवॉश वापरतो. चेहरा काळवंडू लागल्यावर आपण केमिकलयुक्त महागडे प्रॉडक्ट्सचा वापर करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आयुर्वेदिक आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करतो. जर टॅनिंगची समस्या दूर करायची असेल तर हळदीचा वापर करा. या घरगुती वापरामुळे टॅनिंगची समस्या दूर होईल आणि चेहरा चमकेल. ह्याचे त्वचेवर साईड इफेक्ट्स पण नाही होत आणि चेहऱ्यावर तेज येईल.

हळदी डी-टॅन फेसमास्क करण्यासाठी लागणारे साहित्य –
हळद
मध
दूध

असा बनवा फेसमास्क –
सर्वप्रथम, एका भांड्यात हळद घेऊन ती भाजून घ्या. हळदीचा रंग ब्राऊन होत नाही तोपर्यंत ती भाजून घ्यावी. आता ही भाजलेली हळद एका बाउल मध्ये कडून घ्या. हळद थंड झाल्यानंतर त्यात, एक चमचा दूध आणि एक चमचा मध घाला आणि ते मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.
मिश्रण मिक्स झाल्यावर ती त्वचेवर लावा, १० मिनिटे झाले की त्वचा थंड पाण्याने धुवून स्वच्छ करा. ही पेस्ट आपण आठवड्यातून २ वेळ वापरावी. यामुळे आपली स्किन ग्लो होईल आणि चेहऱ्यावरील समस्याही दूर होईल.

हळदीमुळे चेहऱ्यासाठी होणारे फायदे –
हळदीमध्ये अँटी-सेप्टिक, अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत. यामुळे चेहऱ्यावरील मुरुम व डागांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. हा फेसमास्क उपयोग करून चेहरा स्वच्छ होतो.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss