Hair Tips: आपण सगळेच आपल्या केसांची काळजी घेत असतो. लांब, दाट, मऊ केसांसाठी वेगवेगळे शाम्पू, कंडिशनर, तेल, सिरम, घरघुती उपाय करत असतो. असं असताना रात्री झोपताना केस मोकळे सोडावेत की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. केसांची निगा राखणे हे प्रत्येकासाठी आव्हान बनले आहे, धावपळीच्या जगात केसांची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. केस लवकर गळू लागतात किंवा पांढरे होण्यास सुरुवात होतात. योग्य पद्धतीने केसांची देखभाल न केल्यास ते गळतात, तुटतात आणि कमजोर होतात,अनेक मोठ्या समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे या स्टोरीत आपण जाणून घेऊया की रात्री केस कसे ठेवावेत.
अनेक महिलांना त्यांचे केस मोकळे ठेवायला आवडतात तर काहींना ते बांधून ठेवायला आवडतात. मात्र, केस मोकळे ठेवल्याने तुटण्याची समस्या वाढू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच रात्री झोपताना केस बांधण्याचा सल्ला दिला जातो.अनेक महिला अशी तक्रार की रात्री केस मोकळे सोडून झोपल्यानं सकाळी केस खूप तुटतात, तर बांधून झोपलं की कमी तुटतात. कोणी म्हणत केस मोकळे सोडून झोपावे तर कोणी म्हणत बांधून झोपावे. केस मोकळे ठेवून झोपण्याचे काही फायदे आहेत तर काही तोटेही आहेत. जर तुमचे केस रफ, लांब आणि जाड असतील, तर ते रात्री झोपताना अधिक गुंततील आणि तुटण्याची शक्यता वाढेल. तसेच केस उशाशी घासले गेल्याने त्यातील फ्रिझ वाढेल आणि केस निस्तेज होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो असे केस असतील तर ते बांधूनच झोपणे योग्य. मात्र, लहान आणि पातळ केस असतील, तर त्यांच्यावर बांधन न बांधन्याचा फारसा परिणाम होत नाही. रात्री डोकं शांत असल्याने जर केस मोकळे ठेवले तर रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळते, ज्यामुळे ते अधिक मजबूत होतात. परंतु, जर केस फारच गुंतत असतील, तर मोकळे ठेवण्याचा विचार पुन्हा एकदा करायला हवा.
केस मोकळे ठेवण्याचा योग्य मार्ग
१. जर तुम्हाला केस मोकळे ठेवून झोपायचे असतील, तर कॉटनऐवजी सिल्कच्या उशीचा वापर करा. सिल्कच्या उशीमुळे केस कमी घासले जातात आणि फ्रिझ कमी होतो.
२. झोपण्यापूर्वी केस सौम्य ब्रशने मोकळे करून झोपल्यास ते फारसे गुंतत नाहीत.
केस बांधून झोपायचे असल्यास
१. केस बांधताना टाइट रबर बँड अथवा क्लिपचा वापर करू नका. यामुळे टाळूला ताण बसतो व केस लवकर कमजोर होतात.
२. चांगला पर्याय म्हणजे मऊ स्क्रंची वापरणे किंवा केस मोठी असल्यास सैल वेणी घालणे. यामुळे केस मोडण्याची शक्यता कमी होते.
३. केसांना थोडेसे तेल लावून हलक्या हाताने केस बांधून झोपा
केस मोकळे ठेवायचे की बांधायचे, याचा निर्णय तुमच्या केसांच्या जाडसरपणा किंवा लांबी यावर अवलंबून असतो. जर केस पातळ आणि लांब असतील, तर हलकी वेणी घालून झोपणे योग्य ठरेल, तर लहान केसांसाठी मोकळे ठेवणे त्रासदायक ठरणार नाही. योग्य पद्धतीने केसांची काळजी घेतल्यास ते निरोगी आणि सुंदर राहतील.रात्री झोपताना केस विंचरु नये असे सांगितले जाते, पण रात्री केस विंचरून झोपल्यानं केसांचं काहीही नुकसान होत नाही. केसातील गुंता काढल्यावर केस कमी गळतात, त्यामुळे केस विंचरुन झोपलो तर केसांना लावलेले तेल वरपासून खालपर्यंत पोहोचते. यामुळे केसांना पोषणही मिळते.
हे ही वाचा :
Holi 2025: युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी होळी निमित्त ‘आई माऊलीचा उदो उदो’ गाण्यावर धरला ठेका
Holi 2025: होळीच्या रंगांपासून काळजी कशी घ्यायची
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.