सध्या आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणातही होत आहे. अनेकदा आपण बाजारातून प्लास्टिकच्या पिशवीतून भाजी आणतो, प्लास्टिकच्या पिशवीतून फास्ट फूड आणतो, अनेक गोष्टी साठी आपण प्लास्टिकचा वापर करतो. तसेच मसालेही प्लास्टिकच्या डब्यात ठेवतो. एवढेच नाही तर काही लोक प्लास्टिकच्या बाटलीमधले पाणीही पितात. मात्र तुमच्या आरोग्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीतले पाणी पिणे किती हानिकारक आहे हे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घ्या…
प्लास्टिकमुळे रक्तदाब कसा वाढतो : आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. आपण अनेकदा प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पितो. मात्र असे केल्याने तुमचा रक्तदाब वाढू शकतो, आणि या सोबत अनेक आजरांना आमंत्रण मिळते, जेव्हाही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायले जातो तेव्हा प्लास्टिकचे छोटे कण पाण्यात मिसळतात आणि त्यानंतर ते पाण्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात. या प्लास्टिकच्या कणांना मायक्रोप्लास्टिक म्हणतात. ते आपल्या शरीरात रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि बराच वेळ रक्तामध्ये राहून आपला बीपी वाढवतात.
संशोधन : विद्यापीठाच्या काही लोकांवर एक संशोधातून एक रंजक गोष्ट समोर आली, ज्यामध्ये त्यांनी काही लोकांना आठवडाभर प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पिण्यास मनाई केली. या संशोधातून असं आढळून आले की आठवडाभरानंतर प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पिणाऱ्यांपेक्षा या बाटलीतील पाणी न पिणाऱ्यांचा रक्तदाब कमी होता.
हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका : काही वर्षांपूर्वी एका शास्त्रज्ञाने असा दावा केला होता की, एका आठवड्यामध्ये सुमारे ५ ग्रॅम मायक्रोप्लास्टिक मानवी शरीरामध्ये प्रवेश करते. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. यामुळे बीपीचा त्रास तर वाढतोच, पण हृदयाच्या समस्या आणि कॅन्सरचा धोकाही वाढतो.
हे ही वाचा:
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर