spot_img
Saturday, February 8, 2025

Latest Posts

हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे

आपल्याला आरोग्याची हिवाळ्यामध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आरोग्यासाठी गुळ खाणे हे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. गुळामुळे आपल्या शरीरात अनेक फायदे होतात पण हिवाळ्यात काही विशेष पद्धतीने गूळ खाल्ल्याने त्याचे फायदे अधिक होतात. काय आहेत गुळ खाण्याची फायदे आणि पद्दत जाणून घेऊया.

थंड वातावरणात ऊर्जा देण्यासाठी शरीराला उबदार ठेवण्यासाठी गुळ खूप फायदेशीर मानला जातो. तसेच अनेक समस्यांपासून बचाव करण्यासाठी देखील मदत होते. आयुर्वेदामध्ये गुळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण तो नैसर्गिक गोड तसेच पौष्टिकतेचा खजिना आहे. त्यात लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक घटक आढळतात. गुळ खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आणि त्वचा उजळण्यासही मदत होते. पण गुळ वेगळ्या पद्धतीने खाल्ल्याने त्याचे फायदे दुप्पट होऊ शकतात.

हिवाळ्यात गुळ आणि तिळाचे लाडू खूप फायदेशीर असतात. तीळ शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करते आणि गुळ मिसळल्यास ते आरोग्यासाठी परिपूर्ण असे मिश्रण तयार होते. हिवाळ्यात तुमचे हाडे मजबूत करण्यासाठी त्याचप्रमाणे तुमची एनर्जी वाढवण्यासाठी तीळ व गुळाचे लाडू उपयुक्त आहेत. हे लाडू तुम्ही रोज नाश्त्यात खाऊ शकता. त्याचप्रमाणे,हिवाळ्यात थंड गुळाचे सरबत पिल्याने तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.हे सरबत डिटॉक्सिफाय म्हणून काम करते आणि रक्त शुद्ध करण्यास देखील मदत करते. हे सरबत बनवण्यासाठी फक्त गरम पाण्यात गूळ विरघळून त्यात लिंबाचा रस घालून सकाळी रिकाम्या पोटी प्या.हिवाळ्यातील सर्वात लोकप्रिय नाश्ता म्हणून गूळआणि शेंगदाणा चिक्की कडे पहिले जाते. शेंगदाण्यांमध्ये प्रथिने असतात आणि त्यात गुळ टाकल्याने ते चवदार आणि पौष्टिक होते. त्यामुळे शरीराला उष्णता तर राहतेच पण उर्जा ही दीर्घकाळ टिकून राहते. लहान मुले आवडीने ही चिक्की खातात. शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी गरम दुधात गूळ मिसळून पिणे हा हिवाळ्यात सर्वात सोपा उपाय आहे.गूळ आणि तूपासह पोळी खाणे हे देखील अत्यंत फायदेशीर मानले जाते.

हे ही वाचा:

Manikarao Kokate यांच्याकडून छगन भुजबळांबद्दल शांततेची भूमिका; म्हणाले, ‘तो’ विषय संपला…

मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घेऊया महत्त्व, इतिहास व धार्मिक कारण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss