Monday, March 25, 2024

Latest Posts

स्वास्थ्यासाठी फायदेशीर तुळशीच्या बिया ‘हे’ आहेत फायदे :

आपल्या सर्वांना ठाऊक आहेच कि तुळस हि एक औषधी वनस्पती आहे. तुळस हि आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार तुळशीचे अनेक फायदे आहेत. तुळस हि आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे.

आपल्या सर्वांना ठाऊक आहेच कि तुळस हि एक औषधी वनस्पती आहे. तुळस हि आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार तुळशीचे अनेक फायदे आहेत. तुळस हि आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. घरात तुळशीचं रोप लावणं हे शुभ मानलं जात. हिंदुधर्माप्रमाणे घरात तुळस लावून तुळशीच्या झाडाची श्रद्धेने पूजा केली जाते. घरात तुळशीचं रोप लावण्याचे अनेक फायदे आहेत. हीच तुळस अँटी बॅक्टरील(antibacterial) आहे. वायरल फिवर(viral fever), त्वचेचे रोग (Skin diseases), तसेच डेंग्यूसारखे (Dengue) अनेक आजार बरे करण्यासाठी तुळस उपयुक्त ठरते. तुळशीची मुळे, पाने हे आपल्या स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत पण तुम्हाला माहित आहे का कि तुळशीच्या बियासुद्धा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. तुळशीच्या बियांमध्ये प्रोटीन( protein), लोह(Iron), आणि फायबर( fiber) यांचे प्रमाण जास्त असते. काही लोक या तुळशीच्या बियांना मंजिरी असं देखील म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया या तुळशीच्या बियांचे फायदे.

इम्युनिटी (Immunity ) वाढण्यास उपयुक्त:

तुळशीच्या बियांचे रोज सकाळी उठल्यावर नियमित सेवन केल्याने आपल्या शरीराची रोग प्रतिकारकशक्ती (Immunity power) वाढते. तुळशीच्या बियांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स (Antioxidant) चे प्रमाण भरपूर असून त्यात फ्लॅव्होनोइड्स (Flavonoids)व फेनोलिक (Phenolic) असते. तुळशीच्या बियांचा काढा हा सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आहे. तुम्ही अगदी चहात सुद्धा या बिया टाकून पिऊ शकता.

पोटदुखी कमी करण्यास मदत:

आजकाल बाहेरच जंक फूड(junk food), तेलकट पदार्थ खाल्याने बरेचदा अनेक लोकांना acidity, अपचनाचा त्रास होत असतो. पोटदुखीचे सर्व त्रास दूरकरण्यासाठी तम्ही तुळशीच्या बिया पाण्यात घालून ५ ते १० मिनिटे ठेऊन त्या मोठ्या झाल्यावर ते पाणी पिऊ शकता. तसे केल्याने तुमच्या पोटदुखीच्या समस्या दूर होतील.

वजन कमी करण्यास मदत:

तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुळशीच्या बिया हा एक उत्तम उपाय आहे. या बियांमध्ये फायबर चे प्रमाण जास्त असून कॅलरीजचे (Calories) कमी असतात. तुम्ही या बिया ग्रीन टी मध्ये टाकून देखील पिऊ शकता.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा :

मुधुमेहासाठी गुणकारी जांभूळ, जाणून घेऊ जांभूळ खाण्याचे फायदे:

कोकण स्पेशल चमचमीत फणसाची भाजीची रेसिपी घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss