Heatstroke : लवकरच उन्हाळ्याला सुरुवात होणार असून शरीराला हीटस्ट्रोक होण्याचा धोका असू शकतो. हीटस्ट्रोक (Heatstroke) म्हणजेच उच्च उष्णतेमुळे होणारी अत्यंत गंभीर शारीरिक स्थिती आणि याचा प्रभाव कायम उन्हाळ्यात होतोच होतो. जेव्हा शरीरातील तापमान नियंत्रण प्रणाली खराब होते आणि शरीराचे तापमान ४०°C (१०४°F) किंवा त्यापेक्षा जास्त होते, तेव्हा हीटस्ट्रोक होतो. यामुळे शरीरातील महत्वाचे अवयव जसे की हृदय, मेंदू आणि किडनी यावर परिणाम होऊ शकतो, आणि हा परिणाम जीवघेणा ठरू शकतो.
फेब्रुवारी महिना संपताच अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटा सूरू झाल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये अनेकांना आरोग्यासंबंधित गंभीर समस्या होतात. उन्हाळा सुरू होताच उष्माघाताचा धोका वाढतो. मार्च ते जून दरम्यान वाढत्या तापमानाचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. वाढलेल्या तापमानामुळे उष्माघात होऊ शकतो. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्याला योग्य पोषण मिळत नाही. ज्यामुळे उन्हाळ्यात बाहेर गेल्यावर चक्कर येण, उष्माघात होणे, डिहायड्रेशन यांच्या सारख्या समस्या उद्भवतात.
उष्मघाताचे लक्षणे :
- उच्च तापमानाचा परिणाम शरीरावर होते. (४०°C (१०४°F) किंवा त्यापेक्षा जास्त)
- त्वचेवर लालसरपणा किंवा त्वचा कोरडी पडणे.
- वेगवेगळी शारीरिक अस्वस्थता, जसे की उलटी, जड श्वास, आणि डोकेदुखी
- गोंधळ्यासारखं, भ्रम किंवा चक्कर येणे.
- मळमळणं किंवा थकवा येणे.
उष्मघाताचे कारण:
- अत्यधिक उष्णतेत जास्त वेळ राहणे
- शरीराला पाणी कमी होणे (डिहायड्रेशन)
- जास्त शारीरिक श्रम करणे, विशेषतः उष्ण वातावरणात
- मद्यपान किंवा इतर द्रव्यांचा अत्यधिक वापर
उष्मघाताचवर उपचार :
- तातडीने थंड सावलीचा सहारा घेणे.
- शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली असेल तर सतत पाणी पिणे.
- पाणी पिताना किंवा इतर कोणत्याही द्रव्याचे सेवन करताना एकदम न पीठ थोड्या थोड्या वेळाने त्याचे सेवन करावे.
- एखाद्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे.
- याशिवाय, टरबूज, खरबूज, काकडी, उसाचा रस, द्राक्षे आणि आंबा पन्ना यांसारखी पाणीयुक्त फळांचे सेवन करणे.
हे ही वाचा:
Skin Care: पिंपल्सच्या समस्येपासून सुटकारा; गुलाब पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी