Holi 2025: होळी दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी १४ मार्च रोजी धूलिवंदन साजरा केला जाणार आहे. रंगपंचीमीच्या निमित्ताने तुम्ही पहिले देवाला रंग लावता. त्यानंतर तुम्ही रंगपंचमी खेळायला सुरुवात करता. पण आज काल एकमेकांना रंग लावताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागले. रंग हे रसायनमुक्त तसेच शुद्ध असणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून कोणालाही त्वचेच्या समस्या उद्भवणार नाही. म्हणूनच तुम्ही घरच्या घरी फुलांपासून रंग तयार करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या फुलांपासून रंगीबेरंगी रंग बनवू शकता आणि ते स्वतः रंगपंचमी खेळण्यासाठी वापरू शकता.
पिवळा रंग कसा तयार करायचा?
कोणत्याही पिवळ्या फुलांपासून तुम्ही पिवळा रंग तयार करू शकता. (उदा., झेंडू) झेंडूच्या पाकळ्यांपासून पिवळा रंग तयार करू शकता, परंतु त्यासाठी झेंडूच्या पाकळ्या खूप महत्वाच्या आहेत. यासाठी या पाकळ्या खूप काळजीपूर्वक निवडाव्या लागतात. पाकळ्यांचा फक्त वरचा भाग घ्या. ते बारीक करा आणि नंतर त्यात कॉर्न स्टार्च घाला आणि पुन्हा तीच प्रक्रिया करा. अशा प्रकारे तुमचा पिवळा रंग तयार होईल.
गुलाबी रंगाची प्रक्रिया
गुलाबी रंग बनवायचा असेल तर पहिले गुलाबाची पाने धुऊन स्वच्छ करा आणि नंतर मिक्सरमध्ये चांगले बारीक करा. मग त्यात गरजेनुसार कॉर्नस्टार्च मिक्स करा.दोन्ही गोष्टी समान प्रमाणात घ्या. त्यानंतर पुन्हा हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करा आणि नंतर ते प्लेटवर पसरवा आणि चांगले कोरडे होऊ द्या. तयार केलेले मिश्रण सुकल्यावर त्याचे तुकडे करा आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर बनवा. तयार झाला तुमच्या गुलाबी रंग.
निळा रंग तयार करण्यासाठी कोणत्या फुलांचा वापर करावा?
निळा रंग तयार करायचा असेल तर लैव्हेंडरचे फुल किंवा जांभळ्या ट्यूलिप सारख्या फुलांचा वापर करता येऊ शकतो. त्या फुलांपासून जर तुम्हला निळा रंग बनवायचा असेल तर तुम्ही अपराजिताच्या निळ्या फुलापासून रंग बनवू शकता. या फुलांना मिक्सरमध्ये चांगले बारीक करा. गरजेनुसार कॉर्नस्टार्च मिक्स करा.दोन्ही गोष्टी समान प्रमाणात घ्या. त्यानंतर पुन्हा हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करा. मग ते मिश्रण प्लेटवर पसरवा आणि चांगले कोरडे होऊ द्या. मिश्रण कोरडे झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर बनवा.
हे ही वाचा :
Bank Holidays in April 2023, एप्रिल महिन्यात बँका तब्बल १५ दिवस बंद, जाणून घ्या सुट्ट्याची यादी
Chaitra Navratri Sabudana Kheer Recipe, उपवास आहे? तर घरच्या घरी बनवा साबुदाणा खीर