पाव हा अनेक पदार्थाचा साथीदार आहे असे म्हटले जाते. काहीतरी चमचमीत मसालेदार खायचा विचार आला तर पाव हा लागतोच. आपल्याकडील वडापाव, मिसळ-पाव, भजी-पाव, पाव-भाजी, कच्ची दाबेली, मसाला पाव असे काही खास पदार्थ पाव खाल्याशिवाय अधुरेच आहे. असे असंख्य पदार्थ आहेत जे पावासोबत खाल्ले तर चांगले वाटते. हल्ली कामाच्या गडबडीत स्वयंपाक करण्यासाठी वेळ नसला किंवा रोजच चपाती भाजी खाऊन कंटाळा आलं असेल तर आपण सरळ बाहेरून पाव विकत आणुन खातो. पाव हा घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाचा आवडीचा पदार्थ असतो. घरात पाव असेल तर झटपट आपण काहीतरी चविष्ट रेसिपी सहज करु शकतो. काहीवेळा आपण आपल्या गरजेनुसार थोडेच पाव विकत आणतो. घरात जर जास्त माणसं असतील तर गरजेनुसार पावाची एक मोठी लादीच घ्यावी लागते. असे असले तरीही अनेकदा घरी आणलेल्या या पावाच्या लादीचा एकाच वेळी पूर्ण उपयोग होत नाही. अशावेळी ते पाव २ ते ३ दिवस तसेच ठेवून शिळे झालेले असतात. दरम्यान, प्रत्येक वेळी उरलेले शिळे पाव फेकून देतो. नेहमी असे केल्याने पाव व पैसे दोन्ही वाया जातात. असे होऊ नये किंवा पाव खरेदी करताना ते ताजे आहेत की शिळे हे कसे ओळखावे ? व पाव शिळे होऊ नये म्हणून काय करावे ते पाहूया.
लादी पाव विकत घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
१. लादी पाव हे शक्यतो बाजारांत वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होतात. पावांच्या आकारानुसार यांचे पॅकेजिंग केलेले असते. जर पावांचा आकार मोठा असेल
तर एका पावाच्या लादीत ६ पाव असतात. जर पावांचा आकार हा लहान असेल तर एका लादीमाध्ये ८ पाव असतात. हे पाव एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये
व्यवस्थित पॅकिंग करून विकायला ठेवलेले असतात. पावांचे हे पाकीट विकत घेताना त्यावरची पाव बनवण्याची डेट व एक्स्पायरी डेट बघून पाव खरेदी
करावेत.
२. लादी पाव खरेदी करताना ते बाजारांत मिळतात तसे पॅकिंग केलेले घेणे टाळावे. कारण पॅकिंग केलेले हे पाव कधी बनवले असतील हे आपण सांगू शकत
नाही. त्यामुळे पॅकेजिंगमधील पाव घेणे टाळावे.
३. लादी पाव विकत घेताना शक्यतो ते एखाद्या चांगल्या बेकारी किंवा दुकानातून खरेदी करावेत. बेकरीमधील पाव हे नेहमी ताजे बनवून विकले जातात. तसेच
त्यांना पॅकिंग केलेले नसते. त्यामुळे ते ताजे आहेत की शिळे हे आपण एकदा तपासून पाहू शकतो.
४. पावाला येणारा सुगंध यावरून तो पाव ताजा आहे कि शिळा याचा आपण अंदाज लावू शकतो.
५. पाव विकत घेताना तो हाताला खूपच सुका लागत असेल किंवा त्यातील ओलावा जाऊन तो कोरडा पडला असेल तर असा पाव विकत घेऊ नये.
अधिक उष्णता व ओलाव्याच्या ठिकाणी पाव ठेवू नये, यामुळे पावाला लगेच बुरशी लागण्याची शक्यता असते. तसेच पाव जर काळ्या, हिरव्या रंगाची बुरशी
लागली असेल तर तो खाऊ नये.
६. एकदा खाऊन उरलेले लादी पाव आपण एका अल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप करून जास्त दिवस नाही, परंतु १ ते २ दिवस ताजा ठेवू शकतो.
या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.
हे ही वाचा:
मुग खायला आवडत नाही? मग घरी बनवा Healthy आणि Tasty चटकदार मुगाची चाट
Healthy And Tasty सोयाबीन थालीपीठ बनवा घरच्या घरी