Thursday, November 30, 2023

Latest Posts

Amazon ची कमाई कशी होते? काय आहे इतिहास?

Amazon चा प्रति सेकंद $१४,९०० तर प्रति दिवस $१. २९ बिलियन इतका प्रॉफिट सध्या होत आहे. आज ॲमेझॉन 13 देशांमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या कंपनीची किंमत ही जवळपास 820 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. ज्याप्रमाणे कंपनीच्या लोगो मध्ये ए पासनू सुरु झालेला Arrow झेडपर्यंत उंचावत जातो, त्याचप्रमाणे कंपनीचा आलेख दिवसेंदिवस यशाची भरारी घेत आहे.

सध्याच्या धका-धकीच्या जीवनात प्रत्येक काम ऑनलाईन करायचं, असा जणू ट्रेंडच सरुु आहे. मोबाईल रिचार्ज असो किंवा कोणतं बिल भरायचं असो, सगळं काही ऑनलाईनच आणि त्यात शॉपिंगबद्दल तर विचारायलाच नको. कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि बरंच काही. शॉपिंगसाठी एक ना अनेक ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत आणि म्हणनचू ऑनलाईन शॉपिंग करण्याचं प्रमाण वाढलं आहे. कितीही ऑप्शन्स असले तरीही ज्याची क्वालिटी उत्तम, तो नंबर वन ठरतो.. मग ऑनलाईन शॉपिंगमध्ये नंबर वन कोण आहे बरं? बरोबर ओळखलंत. ए फॉर अ‍ॅमेझॉन. ज्याच्या नावाची सुरुवातच पहिल्या अल्फाबेटने होते तो एक नंबर ठरणारच ना! अ‍ॅमेझॉन. ए टू झेड. सारं काही मिळेल असा हक्काचा ऑनलाईन बाजार. चला तर मग जाणनू घेऊया आपल्या हक्काच्या अ‍ॅमेझॉनबद्दल.

ॲमेझॉन ही जगातील सर्वात लोकप्रिय आणि चांगली सुविधा देणारी, American Multinational Technology Company अर्थात ई-कॉमर्स कंपनी आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या ब्रॅंड्सपैकी एक अशी ॲमेझॉनची ओळख आहे. अल्फाबेट, ॲपल, मेटा, आणि मायक्रोसॉफ्ट सोबतच ॲमेझॉन ही पाच मोठ्या अमेरिकन माहिती तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. Amazon कंपनीचे Headquarter अमेरिकेतील Washington येथील Seattle या ठिकाणी आहे. कंपनीचे सीईओ Jeff Bezos यांनी २०२१ मध्ये राजीनामा दिल्यांनतर Andy Jassy हे सीईओ पदाचा कारभार सांभाळत आहेत आणि Jeff Bezos हे चेअरमन आहेत. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे न्यूयार्क मधील एका इन्व्हेस्टिंग कंपनीमध्ये व्हॉइस प्रेसिडेंट होते.त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की, इंटरनेटची प्रगती खपू झपाट्याने होत आहे. म्हणूनच, इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेऊन बेझोस यांनी व्हॉइस प्रेसिडेंट या पदाचा राजीनामा दिला आणि इंटरनेट क्षेत्रात आपला व्यवसाय चालू करण्याचे ठरवले. बेझोस यांनी २० ते २५ अशा गोष्टींची यादी बनवली जे ते ऑनलाईन विकू शकतील. त्या यादीतनू त्यांनी पुस्तके ऑनलाईन विकण्याचा निर्णय घेतला. पुस्तकांची किंमत बदलत नाही, त्यांची कोणती मुदतही नसते त्यात एकाच जागी अनेक प्रकारची पुस्तके विकत घेता येत असतील तर कोण नाही म्हणेल? म्हणनू त्यांनी पुस्तके ऑनलाईन विकण्याची सुरुवात केली.

जेव्हा कधी एखाद्या पुस्तकाची ऑर्डर कोणी करेल, तेव्हा ते पुस्तक बाजारातनू विकत घेऊन त्या व्यक्तीला पोहचवायचं अशी आयडिया त्यांच्या डोक्यात होती. बिझनेस आयडिया फायनल केल्यानंतर ते सिएटलला गेले कारण या शहरामध्ये पुस्तकांची बरीच होलसेल दुकाने होती. अशा तऱ्हेने १९९४ मध्ये जेफ बेझोस यांनी आपल्या गॅरेजमधनू ॲमेझॉनची सरुुवात केली. सुरुवातीला Amazon कंपनीचे नाव Cadabra असे होते. शब्दाचा योग्य अर्थ लागत नसल्यानेआणि ग्राहकांना कंपनीचेनाव समजायला किंवा बोलायला अडचण येते हे समजताच, बेझोस यांनी Relentless.com असे नाव रजिस्टर केले. त्यानंतर बराच विचार केल्यावर जगातील इतर कोणत्याही नद्यांपेक्षा मोठी असलेली Amazon या प्रसिद्ध नदीच्या नावावरून कंपनीचे नाव Amazon असे ठेवण्यात आले.

Amazon कंपनीची कमाई त्यांच्या वेबसाईटवरून विकल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्सच्या कमिशनमधनू मिळते. Amazon स्वतः वस्तूंचे उत्पादन न करता इतर प्रोडक्शन कंपन्यांकडून प्रॉडक्ट विकत घेतात. तर कधी स्वतःच्या वेबसाईटवर ऑनलाईन display करून कस्टमरने वस्तू विकत घेतली, तर Amazon ला पैसे मिळतात. Amazon affiliate program मार्फत कंपनीचे प्रॉडक्ट विकून, त्यामार्फत ग्राहकांना कमिशन मिळवता येते. २४ तास सुरु असणाऱ्या Amazon कंपनीचे जगभर मार्केट आहे. त्यामुळे प्रत्येक देशात त्यांची वेगवेगळी वेबसाईट आहे. www.amazon.com ही त्यांची कंपनी वेबसाईट आहे. तर भारतात www.amazon.in ही वेबसाईट आहे.

Amazon कंपनी Supermarket, Amazon Prime Video, Amazon Alexa, Amazon Pay, Amazon Luna, Digital Distribution, Cloud Computing Amazon Prime, Amazon App Store, Amazon Prime Video अशा सुविधा देते. Amazon चा प्रति सेकंद $१४,९०० तर प्रति दिवस $१. २९ बिलियन इतका प्रॉफिट सध्या होत आहे. आज ॲमेझॉन 13 देशांमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या कंपनीची किंमत ही जवळपास 820 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. ज्याप्रमाणे कंपनीच्या लोगो मध्ये ए पासनू सुरु झालेला Arrow झेडपर्यंत उंचावत जातो, त्याचप्रमाणे कंपनीचा आलेख दिवसेंदिवस यशाची भरारी घेत आहे.

हे ही वाचा : 

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss