Thursday, November 30, 2023

Latest Posts

WhatsApp ची कमाई कशी होते? काय आहे इतिहास?

जगभरात २ बिलियन आणि भारतात ३९० मिलियन इतके WhatsApp युजर्स आहेत. चीन, इराण, सीरिया, क्युबा आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये WhatsApp वर बंदी असल्यामुळे आपण तिथे WhatsApp वापरु शकत नाही. Meta Platforms, Inc. या कंपनीच्या अतं र्गत आता WhatsApp चे कार्य सुरु आहे.

आधी कोणी मित्र भेटल्यावर Hey What’s up? असं विचारपसू करण्याच्या दृष्टीने जितकं सहजपणे विचारलं जायचं, तितक्या सहज आता हा तुझा WhatsApp नंबर आहे का?’ हे विचारलं जातं. WhatsApp. प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसारखं आता WhatsApp प्रत्येकाला गरजेचं झालं आहे. हे Documents मला WhatsApp कर, हे फोटो पाठव हां मला WhatsApp वर, मला WhatsApp ला Hi कर मी तो video पाठवते, अगं आवाज येत नाही तुझा नीट, WhatsApp Call कर ना, WhatsApp Status ला photo पाहिले मी, तिचा Birthday आहेना आज, WhatsApp Group वर मेसेज आलेला, बापरे! दिवसातनू किती वेळा आपण WhatsApp चाच जप करत असतो. सारं काही WhatsApp वर अवलंबनू. प्रत्येक काम WhatsApp मुळे सोपं झालं आहे. रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेल्या WhatsApp ची नेमकी सुरुवात कधी झाली? कोणी केली? काय आहे त्याची Success Story? चला तर मग जाणनू घेऊया WhatsApp ची कहाणी.

२००९ पर्यंत Jan Koum आणि Brian Acton हे दोघे मित्र Yahoo या ठिकाणी काम करत होते. त्यांनतर त्यांनी Yahoo येथील नोकरी सोडून दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला. फेसबकु, ट्विटर यांसारख्या मोठ्या कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा बाळगून त्यांनी Interview दिला. पण तेव्हा त्यांच्या पदरी निराशा आली. सर्व कलागुण असूनही आलेला नकार ते पचवू शकले नाहीत. मग काही तरी नवीन करण्याचे त्यांनी ठरवले. आणि त्यातनचू WhatsApp चा उदय झाला. लहानपणी सफाई कामगाराचं काम करणारे जेन कुम आज अब्जावधींचे मालक आहेत. त्यांनी सहज संवाद साधता यावा यासाठी बरेच परिश्रम घेऊन WhatsApp ची निर्मिती केली. जेन कुम यांनी स्वतःसाठी ॲपलचा फोन खरेदी केला होता. त्यात ते स्काईपद्वारे इतरांशी बोलायचे, परंतु एकदा पासवर्ड विसरल्याने त्यांचं ते अकाउंट बंद झालं, आणि तेव्हापासनू त्यांच्या डोक्यात विचार आला की असं कोणतं तरी ॲप हवं, ज्याला पासवर्डची गरज नसेल, जे फक्त मोबाईल नंबर टाकला की सरुु होईल. याबद्दल विचार करता-करता त्यांनी WhatsApp चा शोध लावला. अमेरिकेतील कॅलिफोर्निया र्नि येथील मेंलो पार्क या ठिकाणी WhatsApp चे मुख्य ऑफिस आहे. मेजिसिगं ॲप असणाऱ्या WhatsApp ची सुरुवात २००९ मध्ये झाली आणि २०१० मध्ये भारतात WhatsApp लाँच करण्यात आले.

प्ले स्टोअरवर सर्वात जास्त डाउनलोड केलेल्या ॲप्सच्या यादीमध्ये WhatsApp पाचव्या क्रमांकावर आहे. सर्वांसाठी महत्त्वाचे झालेले WhatsApp हे असे App आहे जे काहीही जाहिरात न करता कमी काळातच जास्त प्रसिद्ध झाले.५३ भाषांमध्ये वापर करण्यात येत असलेल्या WhatsApp वर दररोज ७० कोटींपेक्षा जास्त फोटो शेयर केले जातात. २०१९ पासनू Will Cathcart हे WhatsApp चे CEO आहेत. २०१४ मध्ये गूगलने WhatsApp ला खरेदी करण्यासाठी १० मिलियन डॉलरची ऑफर देऊ केली होती, परंतु त्यांनी ती नाकारली. काही महिन्यानंतर फेसबकुने WhatsApp ला १९ बिलियन डॉलर मध्येविकत घेतले. जगामध्ये भारतानंतर ब्राझीलमध्ये लोक WhatsApp चा जास्त वापर करतात. भारतात जितके मोबाइलधारक आहेत त्यातील जवळपास ९०% लोक WhatsApp वापरतात. WhatsApp वर दररोज १० कोटींपेक्षा जास्त व्हिडिओ शेयर केले जातात आणि 43 कोटींपेक्षा जास्त मेसेजेस पाठवले जातात.

१५ मिलियन पेक्षा जास्त Active Users असणाऱ्या WhatsApp वर दररोज १ मिलियन पेक्षा जास्त लोक जोडले जात आहेत. २०१६ पर्यंत आयफोन मध्ये WhatsApp डाऊनलोड करण्यासाठी एक डॉलर इतके वार्षिक शुल्क द्यावे लागत होते. फ्री मेसेजिंग सर्व्हिस असणाऱ्या WhatsApp ला WhatsApp Business द्वारे प्रॉफिट होतो. इतर कंपन्यांसोबत करार केल्यामुळे WhatsApp ला फायदा होतो. Amazon, Twitter, Flipkart किंवा इतर कोणत्याही कंपनीचे WhatsApp वर जर मेसेज येत असतील तर WhatsApp ची आणि त्या कंपनीची Business deal झालेली असते, त्यातूनच WhatsApp ला पैसे मिळतात, आणि त्या कंपनीची प्रसिद्धी होते. जगभरात २ बिलियन आणि भारतात ३९० मिलियन इतके WhatsApp युजर्स आहेत. चीन, इराण, सीरिया, क्युबा आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये WhatsApp वर बंदी असल्यामुळे आपण तिथे WhatsApp वापरु शकत नाही. Meta Platforms, Inc. या कंपनीच्या अतं र्गत आता WhatsApp चे कार्य सुरु आहे.

हे ही वाचा : 

कुणबी प्रमाणपत्रबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Amazon ची कमाई कशी होते? काय आहे इतिहास?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss