सध्या भारतात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. डेंग्यू हा शरीरातील रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्यानं एडिस इजिप्ती ही डासांची प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, डासाने चावा घेतल्या नंतर ४ ते १० दिवसांत डेंग्यूची लक्षणं दिसू लागतात आणि त्यानंतर ३ ते ७ दिवसांपर्यंत डेंग्यूची लक्षणं कायम राहतात. डेंग्यू आजाराच्या बाधित असणाऱ्या रुग्णांना १०२ ते १०४अंश सेल्सिअसपर्यंत ताप (High Fever) येत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
डेंग्यूची लक्षणं नेमकी काय?
डेंग्यू तापाच्या पहिल्या स्थितीत रुग्णाला तीव्र ताप येतो आणि अचानक थंडी वाजून येते. याशिवाय अंगदुखी,डोकेदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणं, अशक्तपणा जाणवणं,अंगावर सूज, मळमळ आणि पुरळ येणं, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, अशी लक्षणं दिसू शकतात. या तापामध्ये शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात, त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी राज्यसरकार ने काही ठोस पाऊलं उचलली आहेत,अशा गंभीर स्थितीत रुग्णाच्या फुप्फुसांवर,मेंदूवर किंवा किडनीवरही परिणाम याचा होऊ शकतो या परिस्थितीत तातडीने उपचारांची गरज असते, त्यामुळे यात कोणताही निष्काळजीपणा टाळावा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डेंग्यूची दुसरी लागण जर टाळायची असेल, तर प्रतिबंधात्मक उपायांवर जास्त भर दिला पाहिजे. डासांच्या अळ्यांना जन्म घेण्यापासून रोखले पाहिजे, घरात साठलेले घाण पाणी साचू देऊ नका. जेथे पाणी साचतं तेथे कीटकनाशकाची फवारणी करत राहावी. डेंग्यूच्या डासांच्या चावण्यापासून स्वतःचं संरक्षण करत रहा या साठी धूप वगैरेचा धूर करा, शरिराची प्रतिकारशक्ती वाढवण्याकडे लक्ष द्या.
डेंग्यूवर उपचार नेमके कोणते ?
डेंग्यूवर ठराविक औषध आणि उपचार नाहीत,पण लक्षणं आढळल्यास योग्यवेळी उपचार आणि काळजी घेतल्यास यावर नियंत्रण मिळवता येतं, डेंग्यूच्या रुग्णाने भरपूर प्रमाणात पाणी प्यावं. डेंग्यूचे रुग्ण हे ४ते ८ दिवसांत बरे होतात. प्लेटलेट्स कमी झाल्यास ते वाढवणारे खाद्यपदार्थ खाण्याची गरज असते, जसे की किवी, किवी हे फळ शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यात फायदेशीर ठरत.
हे ही वाचा :
केरळ बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात अलर्ट
बदलत्या हवामानामुळे तुमची मुलं आजारी पडतायत? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या