Monday, December 4, 2023

Latest Posts

HALDIRAM चा शोध कसा लागला? काय आहे याची STORY?

सर्वजण शेवेची स्तुती करायला लागले. कोणी बनवली ही भुजिया? इतकी कुरकुरीत कशी काय? असं काय स्पेशल आहे यात? बेसन पासूनच बनवली आहे ना? असे एक ना अनेक प्रश्नांची विचारला त्यावेळी करण्यात आली.

भुजिया म्हटलं की, डोळ्यासमोर पहिला ब्रँड येतो तो म्हणजे हल्दीराम. स्नॅक्सचा कोणताही प्रकार असो, हल्दीरामने प्रत्येक ठिकाणी बाजी मारली आहे. हल्दीरामची आयडिया कोणाची होती? त्याचा शोध कसा लागला? त्यांनी यशाचे शिखर कसं गाठलं? चला तर मग जाणून घेऊया हल्दीरामची गोष्ट.

भारत देश स्वतंत्र होण्याआधीच १९३७ मध्ये गंगा बिशन अग्रवाल यांनी राजस्थान मधील बिकानेर येथील छोट्याशा नमकीन दुकानापासून हल्दीरामची सुरुवात केली. गंगा बिशन अग्रवाल यांना लाडाने हल्दीराम असे म्हटले जायचे. पुढे जाऊन हेच नाव त्यांचा ब्रँड बनला. हल्दीरामचे वडील त्यांच्या दुकानात मोठी शेव विकायचे. एकदा सुट्टीच्या वेळी घरी आलेल्या हल्दीरामच्या मावशीने शेव बनवताना त्यात बेसन सोबत मटकीची डाळ वापरली. यामुळे त्यांनी बनवलेली शेव छान कुरकुरीत बनली. हल्दीराम यांना ही शेव आवडल्यामुळे त्यांनी वडिलांना मदत करतांना त्यांच्या दुकानात मटकीच्या डाळीची शेव बनवायचं ट्राय केलं. बाजारात मिळणाऱ्या इतर बऱ्याच शेवच्या प्रकारांतून मटकीच्या डाळीची शेव चटकदार लागत होती. या शेवची टेस्ट लोकांना आवडायला लागली. बाजारात मिळणाऱ्या दुसऱ्या शेवेच्या किमतीपेक्षा या शेवची किंमत हल्दीराम यांनी थोडी वाढवली. ५ पैसे किमतीला मिळणारी ही शेव ग्राहकांना आवडू लागली.इतर शेवेच्या तुलनेने थोडी महाग असणारी शेव ग्राहकांना क्वालिटी आणि टेस्ट यांच्या जोरावर ग्राहकांच्या पसंतीस पडली.

३०० नमकिनच्या दुकानांपैकी, इतरांच्या शेवेपेक्षा वरचढ असणारी शेव सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी, हल्दीराम यांनी त्या शेवला ओळख देण्याचे ठरवले. असं एक नाव ज्याने ती प्रत्येकाच्या ओळखीची होईल, असा विचार त्यांच्या डोक्यात आला. म्हणूनच, हल्दीराम यांनी बिकानेरचे प्रसिद्ध महाराजा डुंगर यांच्या नावावरून त्यांच्या शेवचे नाव ‘डुंगर शेव’ असे ठेवले.एकदा १९५५ मध्ये कोलकाता येथे हल्दीराम मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. तिथे त्यांनी स्वतः भुजिया बनवल्या होत्या.तिथे आलेल्या पाहुण्यांना ती शेव इतकी आवडली की, सर्वजण शेवेची स्तुती करायला लागले. कोणी बनवली ही भुजिया? इतकी कुरकुरीत कशी काय? असं काय स्पेशल आहे यात? बेसन पासूनच बनवली आहे ना? असे एक ना अनेक प्रश्नांची विचारला त्यावेळी करण्यात आली.

(सविस्तर लेख थोड्याच वेळात)

हे ही वाचा : 

कुणबी प्रमाणपत्रबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss