spot_img
spot_img

Latest Posts

पोटाशी संबधित समस्या दूर करण्यासाठी ओवा कसा आहे गुणकारी

आजकाल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या उद्धभवत आहेत. पोटात गॅस असेल तर गंभीर समस्या ही निर्माण होऊ शकतात. ओवा हा एकमेव पदार्थ आहे, जो तुम्हाला पोटाच्या संबंधित आजारांपासून दूर ठेऊ शकतो.

आजकाल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या उद्धभवत आहेत. पोटात गॅस असेल तर गंभीर समस्या ही निर्माण होऊ शकतात. ओवा हा एकमेव पदार्थ आहे, जो तुम्हाला पोटाच्या संबंधित आजारांपासून दूर ठेऊ शकतो. ओव्याला त्याच्या आयुर्वेदीक कारणांमुळे बहुगुणी ही म्हणले जाते. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ओवा घेतल्यास गॅस आणि अ‍ॅसिडिटीच्या समस्या ही दूर होऊ शकतात. ओवा हा तुम्ही भाजीत घालून खाऊ शकता किंवा तो गरम पाण्यासोबत घेतल्यास त्याचा परिणाम अधिक जाणवतो. तसेच पोटातील गॅस हा अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतो. तसेच अ‍ॅसिडिटीच्या समस्येमुळे देखील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वेळी काय करावे जाणून घेऊयात.

ओवा खाण्याचे फायदे

पोटदुखीपासून किंवा पोटाच्या संबधित आजारापासून तुम्हाला आराम हवा असल्यास तुम्ही रोज सकाळी ओवा चावून खाणे खूप गरजेचे आहे. सकाळी ओवा चावून खाल्याने तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तर तुम्ही सकाळच्या चहामध्ये चहापत्ती सोबत ओवा देखील घालू शकता. तसेच एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा घाला आणि ते पाणी चांगले उकळू द्या. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या. यामुळे पोटदुखी आणि गॅसच्या समस्येपासून तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो.

ओवा हे एक आयुर्वेदिक औषध आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. यामुळे अपचन दूर करण्यासोबतच लठ्ठपणाही दूर करण्यास खूप मदत होते. एका स्वच्छ भांड्यात एक ग्लास पाणी उकळून त्यात एक चमचा ओवा आणि आल्याचा तुकडा घालून ते चांगले उकळा. त्यानंतर ते पाणी गाळून प्या. हे पेय रोज पिल्यास पोटाचे अनेक आजार ही दूर होऊ शकतात.

आजकाल खराब जीवनशैलीमुळे गॅस-अ‍ॅसिडिटी, छातीत जळजळ, गॅस आणि पोटदुखी अशा समस्या खूप सामान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत कोमट पाण्यासोबत ओव्याचे सेवन केल्यास या समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच रोज केल्या जाणाऱ्या भाज्या किंवा कोशिंबीर यात देखील ओव्याचा वापर केल्यास शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. पोटदुखीचा त्रास होत असल्यास दिवसातून दोन वेळा ओवा आणि हिंग मिसळून ते चाटण घ्या. यासाठी चिमूटभर ओवा आणि हिंग घ्या. ते मिसळा त्यानंतर हे चाटण घेऊन त्यावर लगेच पाणी प्या. ओवा खाल्याने हाडे मजबूत होतात आणि वेदना ही दूर होतात.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा: 

गणेश चतुर्थी नेमकी १८ सप्टेंबरला आहे की १९ सप्टेंबरला ? जाणुन घ्या

Mental and physical health मानसिक ताणाला आणि आरोग्याला चालना देण्यासाठी ‘या’ गोष्टी करून पहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss