आपल्या शरीरासाठी कॅल्शियम हा एक अत्यंत महत्त्वाचा खनिज घटक आहे. हाडांच्या बळकटीपासून स्नायूंच्या कार्यक्षमतेपर्यंत, रक्ताच्या गाठींवर नियंत्रण ठेवण्यापासून दातांच्या मजबुतीपर्यंत कॅल्शियमची भूमिका महत्त्वाची असते. अनेकांना असे वाटते की कॅल्शियमची कमतरता फक्त हाडांवर परिणाम करते, परंतु याची लक्षणे नखांवर देखील दिसू शकतात. महिलांना मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कमी असल्यामुळे त्रास जाणवतात. पोस्टमेनोपॉझल आणि अलीकडे गर्भवती महिलांना कॅल्शिअमची कमतरता जाणवते. तसेच लहान मुलांमध्ये देखील कॅल्शियमची कमतरता जाणवते. नखांमध्ये अचानक बदल जाणवणे, नखे ठिसूळ होणे, पांढऱ्या रेघा दिसणे किंवा नखे खूपच नाजूक होणे, ही सर्व कॅल्शियमच्या कमतरतेची संभाव्य लक्षणे असू शकतात.
अपुरा आहार, हार्मोनल बदल,Vitamin D ची कमतरता, काही वैद्यकीय अटी, यांमुळे शरीरात कॅल्शिअमची कमतरता जाणवते. शरीरात जर पुरेशा प्रमाणात कॅल्शियम नसेल, तर नखे कमजोर होतात, पटकन तुटतात किंवा त्यावर असामान्य रेषा किंवा खड्डे निर्माण होऊ शकतात. यासाठीच, नखांमध्ये येणारे बदल दुर्लक्षित करू नयेत, कारण ते तुमच्या एकूण आरोग्याविषयी महत्त्वाचे संकेत देत असतात. जर नखे अचानक खूपच ठिसूळ आणि नाजूक होऊ लागली असतील, तर हे कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्याने नखे योग्यरित्या वाढू शकत नाहीत आणि कमकुवत बनतात. विशेषतः सतत तुटणारी आणि पातळ होणारी नखे ही कॅल्शियमच्या अभावाची स्पष्ट खूण मानली जाते. अशा स्थितीत आहारात भरपूर कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते.त्याचप्रामणे व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात घेणे, जीवनशैलीत बदल,नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा :
अमेरिकेतील विमान अपघातात १९ जणांचा मृत्यू, ६४ जण अजूनही विमानातच, बचावकार्य सुरूच…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .