spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

पचनक्रिया बिघडली असेल तर ‘या’ गोष्टींमुळे मिळेल आराम

पचनक्रिया बिघडली असेल तर ‘या’ गोष्टींमुळे मिळेल आराम

पोट बिघडलं असेल किंवा पचनक्रिया सुरळीत नसेल तर हि बातमी तुमच्यासाठी. पोटाच्या संबंधित कोणताही त्रास असेल तर ‘या’ गोष्टींमुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. अपचन, अ‍ॅसिडिटी आणि गॅस्ट्रिक समस्यांचा समावेश असेल 5 हेल्दी टिप्स सांगितल्या आहेत, याविषयी नक्की वाचा.

जे तुम्ही खाता ते तुम्हाला पाचट का? अन्न तुम्ही किती चांगल्या प्रकारे खाता आणि ते किती पचत यावर अवलंबून असत. बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा आहारामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात त्यामुळे पचनक्रिया बिघडते, पोट दुखणे, आतड्यांना सूज येणे, बद्धकोष्ठता, गॅस, अतिसार आणि पोटाच्या इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तज्ज्ञांनच्या सल्यानुसार अशावेळी त्याच गोष्टींचा समावेश करावा ज्या पचण्यासाठी हलक्या असतात. याचबरोबर आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे नक्की जाणून.

प्रोबायोटिक खाद्यपदार्थ :
प्रोबायोटिक खाद्यपदार्थ म्हणजे असे पदार्थ जे शरीरासाठी फायदेशीर असलेल्या जिवाणूंना (बॅक्टेरिया किंवा यीस्ट) वाढवण्यास मदत करतात. हे जिवाणू पचन तंत्राला मदत करतात. शरीरात पेशींपेक्षा आडत्यांमध्ये जास्त बॅक्टेरिया असतात त्यामुळे आहारात दही, ताक, तूप , घरगुती लोणचे, आणि उत्तर भारतातील खास कांची या पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला प्रोबायोटिक मुबलक प्रमाणात मिळते.

फायबरयुक्त फळे आणि भाज्या :
आहारात फळे किंवा भाज्यांचा समावेश केला तर शरीराला उत्तम प्रमाणात फायबर मिळते. केवळ चांगले बॅक्टेरिया वाढण्यासह शरीराती पाण्यासह पचनक्रियाहि सुधारते. त्यामुळे पोट दुखीची समस्या असेल तर संत्री, केळी, सफरचंद, भेंडी यांचा समावेश तुम्ही आहारात नक्कीच करून बघा याचा तुम्हा फायदा होईल.

धान्य :
राजगिरा, क्विनोआ आणि ओट्स सारखे संपूर्ण धान्य फायबच नाही तर यात कार्बोहायड्रेट देखील असते त्यामुळे पचन संस्थेसाठी खूप महत्चाचे ठरते. ज्यामुळे कोणत्याची अडथळ्याशिवाय हे धान्य पचण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्या टळतात.

आले :
आले हे पचनसंस्था सुधारण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे जळजळ कमी होते पचनक्रिया सुधारते. आल्याचे सेवन केल्याने लहान आतड्यात अन्न लावले पोहोचण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या टळतात त्यामुळे आहारात याचा नक्की समावेश करा.

त्रिफळा :
त्रिफळ हे पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. त्रिफळ हे तीन फळांपासून बनवले जाते : आवळा, मायरोबलन आणि बहेडा. त्रिफळामुळे पोटातील जळजळ कमी होते, भूक वाढतं नाही, पचनक्रिया सुधारते, त्रिफळात व्हिटॅमिन C चा चांगला स्रोत आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss