लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींना विविध शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातही पोटावर साठलेली फॅट कमी करणे सर्वात अवघड मानले जाते. लठ्ठपणामुळे गुडघे, कूल्हे, आणि पाठीच्या हाडांवर जास्त ताण येतो, ज्यामुळे सांधेदुखी आणि इतर हाडांच्या समस्या होऊ शकतात. वजन करण्याचा उपाय शोधलासल तर आम्ही हि तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत नक्की वाचा.
नाश्त्यामध्ये नटसचे सेवन करा
बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरासंबंधित आजार वाढताना दिसत आहेत. आपल्या आहारावर, शरीरावर याचा ताण वाढत आहे. त्यातीलच मोठी समस्या म्हणजे लठ्ठपणा. या लठ्ठपणामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाची शक्यता वाढते. अतिरिक्त वजन हृदयावर जास्त ताण येतो, ज्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होऊ शकते.लठ्ठपणामुळे आत्मसन्मान कमी होऊ शकतो आणि व्यक्ती मानसिक तणाव, चिंताग्रस्तता, आणि डिप्रेशनचा सामना करावा लागतो. पोटावर फॅट जमा झाल्याने तुमच्या शरीरातील लिवर आणि किडनीवर यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर नक्की वाचा ‘या’ टिप्स.
रोज सकाळी लोक पोटभरून नाश्ता करतात. नाश्ता करताना अनेक चमचमीत तसेच टेस्टी नाश्ता करण्याची सवय असते. या नाश्यासोबत तुम्ही नियमित नटसचे सेवन करा. कारण नटसच्या सेवनाने तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. नटसमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असते ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि जास्त भूक लागत नाही. यासाठी तुम्ही नित्यनियमाने नाश्त्यात बदाम, अक्रोड, काजू आणि मनुका याचा समावेश करा.
सकाळी नाश्त्यात फळांचे सेवन करा
सकाळी नाश्त्यात फळांचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. हे शरीरासाठी पौष्टिक असते आणि आरोग्यासाठी विविध फायदे प्रदान करते.फळांमध्ये नैतिक शर्करा (फ्रक्टोज) आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला तत्काळ ऊर्जा प्रदान करतात, त्यामुळे सकाळी दिवसाची सुरुवात ताजेतवाने होते. यासाठी तुम्ही सफरचंद किंवा डाळिंब निवडू शकता.
या पदार्थांचे सेवन करू नका
वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात साखर, पांढरे मीठ आणि पीठ यासारख्या गोष्टींपासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा. असे केल्याने तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कोणत्याच अडचणी येणार नाही तसेच जलद गतीने तुम्ही वजन कमी करू शकता.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका