spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

तुम्हाला जर तुमचा चेहरा चमकदार करायचा असेल आणि वजन कमी करायचं असेल तर, तुम्ही महिनाभर खा ‘हे’ फळ

सध्या सगळ्यांच्या आयुष्यात आपण धावपळ पाहत आहोत. या धावपळीच्या काळात आपण आपल्या आरोग्यावर नीट लक्ष्य देत नाही. मात्र आपण आजच्या धावपळीच्या काळामध्ये निरोगी राहणे हे आपले पहिले प्राधान्य असायला हवे. जर आपल्या निरोगी असण्याबद्दल म्हणजेच विशेष आहाराबद्दल बोलतो तेव्हा फळांचा उल्लेख आवर्जून केला जातो. पण एक असं फळ ज्याबद्दल क्वचित चर्चा केली जाते. ते फळ म्हणजे अननस… हे रसाळ आणि गोड फळ खूपच पोषण आणि फायद्यांनी परिपूर्ण आहे. हे फळ चविष्ट आहे पण त्याचा आपल्या आरोग्यालाही खूप फायदा होतो. तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्ही महिनाभर अननसाचे सेवन केले. तर या फळाचा तुमच्या शरीरावर कसा आणि काय? परिणाम होतो. ते जाणून घेऊया.

फळ खाल्याने त्वचेवर येते चमक
अननस हे फळ आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर आहे. अननसामध्ये अनेक चांगले घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. अननसामध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंटस आणि जीवनसत्वे असतात. यामुळे आपल्या त्वचेची चमक कायम राहण्यास मदत होते. अननसाचे नियमीत सेवन केल्याने त्वचेचे मुक्त रॅडिकल्सपासून आपले संरक्षण होते, ज्यामुळे वृद्धत्वचेची प्रक्रिया मंदावते. तुम्ही महिनाभर अननस खाल्ल्याने तुमच्या त्वचेत अनेक चांगले नैसर्गिक चमक आणि ताजेपणा येऊ शकतो. तसेच अननसमध्ये अँटी इंफ्लेमेटरी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे सांधेदुखी, ऑस्टिओपोरोसिस कमी होण्यास मदत होते.

त्वचेवर येईल चमक
अननसाचे सेवन केल्याने पचनशक्ती तर सुधारतेच शिवाय गॅस, ॲसिडिटी, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांपासूनही दूर राहते. याशिवाय अननसाचा ज्यूस प्यायल्याने जास्त भूक लागते. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यवरची चमक चांगली ठेवायची असेल तर तुम्ही अननसाचे सेवन नियमित करावे. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंटस आणि जीवनसत्वे असतात. ज्यामुळे त्वचेची चमक कायम राहण्यास मदत होते. तसेच अननसाच्या सेवनाने त्वचेवरील मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण होते, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावर तेज आणि ताजेपणा पाहिजे असलं तर तुम्ही रोज नियमित अननस खावे.

हाडे मजबूत होतात

अननसामध्ये मॅगनीज घटक आढळते, जे आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी खूप महत्त्वाचे आहे. अननसाचे महिनाभर नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.

हे ही वाचा:

मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची कवितेतून जोरदार फटकेबाजी, पंतप्रधान आहे पळणारा चित्ता…

PM Narendra Modi LIVE: शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की… अकोल्यातून पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss