spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

यंदाची ख्रिसमस पार्टी खास करायची असेल तर; या हेल्दी ट्रिक्स नक्की करून बघा…

डिसेंबरचा महिना सुरु आहे आणि त्यातच सगळ्यांना २५ डिसेंबर म्हणजे ख्रिसमस पार्टीचे वेध लागले आहेत. जर हि ख्रिसमस पार्टी घरच्या घरीच करत असाल तर तुम्ही पाहुण्यांना इम्प्रेस करण्यासाठी या हेल्दी ट्रिक्सचा नक्की फायदा करून घेऊ शकता. जाणून घ्या या ट्रिक्सची रेसिपी.

ख्रिसमस हा सण लहानमुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आवडीचा सण मानला जातो. ख्रिसमस जवळ आला कि सगळ्यांना पार्टी, गिफ्ट्स , म्युझिक , डान्स अशा अनेक एन्जॉयमेंटच्या गोष्टी करायच्या असतात. परंतु तुम्हाला यंदाची पार्टी घरच्या घरीच करायची असेल तर त्या तयारीची लिस्ट सर्वात पहिले तयार करता मग मुद्दा येतो कि या ख्रिसमस पार्टीत कोणती सोप्पी आणि अनोखी हेल्दी डिश बनवायची? तर नक्की या ट्रीक्स करून बघा.

हॉट चॉकलेट
ख्रिसमस पार्टीसाठी तुम्ही तुमच्या पाहुण्यांना हॉट चॉकलेट नक्कीच बनवून द्या. हॉट चॉकलेट बनवण्याची पद्धत- एका पॅनमध्ये दूध आणि कोको पावडर घेऊन ते मिश्रण चांगले मिक्स करा, या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्या, त्या मिश्रणाला उकळी येई पर्यंत चमच्याने हळू हळू ढवळत रहा . हे मिश्रण चांगले गरम झाल्यावर या मिश्रणात चवीनुसार साखर आणि व्हॅनिला इसेन्स टाका त्यामुळे या हॉट चॉकलेटची चव अजूनच वाढेल. त्यात नंतर किसलेले चॉकलेट घाला ते चॉकलेट चांगले मिक्स होईपर्यंत ढवळा. तुमचे हॉट चॉकलेट तयार आहे.

आवळा सरबत
आवळा सरबत बनवण्यासाठी आवळा नीट धुवून कापून घ्या . कापलेल्या आवळ्याचे तुकडे मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट तयार करा हि पेस्ट बनवत असताना त्यात एक ग्लास टाका हि पेस्ट तयात झाली कि एका मऊसूत कपड्यातुन हे मिश्रण चांगले गाळून घ्या. त्यानंतर एका पातेल्यात आवळ्याचा रस आणि साखर घालून ते चांगले एकजीव करा. या आवळ्याच्या रसात पुदिन्याची पान आणि लिंबाचा रस घाला. हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्या आणि नंतर ते गाळून घ्या. आवळा सरबत सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. हिवाळ्यात आवळ्याचे सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते त्यामुळे तुम्ही हि ट्रिक नक्की करून बघा.

बाजरी राब
ख्रिसमस पार्टीमध्ये तुम्ही ऑपशन म्हणून बाजरीचे राब नक्की तयार करून बघा. हे राब बनवण्यासाठी मंद आचेवर तवा ठेवा आणि त्यात गरम तूप घाला. त्यात ओवा खालून ते चांगले भाजून घ्या त्यात बाजरीचे पीठ घालून ते सुद्धा चांगले भाजून घ्या, त्यानंतर त्यात गरम पाणी घालून ते मिश्रण चांगले मिक्स करा. हे मिश्रण सतत ढवळत रहा जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत. मग या मिश्रणात गुळ, दालचिनी पावडर, लवंग पावडर आणि सुंठ पावडर घालून मिक्स करा. हे मिश्रण चांगले उकळून द्या जेणेकरून पेस्ट थोडी घट्ट होईल. त्यात किसलेले कोरडे खोबरे घाला यानंतर बारीक चिरलेले काजू आणि बदाम घाला आणि गरमागरम सर्व्ह करा.

हे ही वाचा:

छगन भुजबळ म्हणजेच ओबीसी समाज का? Suhas Kande यांचा भुजबळांवर हल्लाबोल

अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या कथित विधानानंतर संसद दणाणली; विरोधक आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss