सकाळी उठल्यावर बर्याच वेळा आपला चेहरा सुजलेला दिसतो. चेहऱ्यावर सूज (swelling) येण्याची अनेक कारणे असू शकतात. रात्री उशिरापर्यंत मोबाईल चालवण्याची आणि दूरदर्शन बघण्याची सवय काही लोकांना असते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नसल्याने चेहऱ्यावर सूज येते. चेहऱ्यावर सूज येणे हा काही गंभीर आजार नाही, परंतु काही रोगांमुळे चेहऱ्यावर सूज येते. चेहऱ्यावर सूज पाहून खूप लोक चिंताग्रस्त होतात, परंतु अस्वस्थ होऊ नका. घरी सोप्या पद्धतीने ही सूज कमी करता येऊ शकते. परंतु सुरुवातीला आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे, की ही सूज का येते?, तर आपल्या चेहर्यावर सूज येण्याचे कारण आणि ते टाळण्याचे सोपे उपाय जाणून घेऊयात.
सूज येण्याचे ३ मुख्य कारणे
त्वचेची ऍलर्जी (Skin allergies)
ताप किंवा चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे देखील ऍलर्जी (Allergies) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही चेहऱ्यावर सूज येऊ शकते. परागकण (Pollen), पाळीव प्राण्यांचा कोंडा, काही खाद्यपदार्थ खाल्याने किंवा कीटक चावल्यामुळे देखील ऍलर्जी होऊ शकते. ऍलर्जीमुळे सायनस अरुंद होऊ शकतात. सायनस (Sinus) अरुंद झाल्यावर आपला चेहरा सुजण्याची शक्यता आहे.
त्वचेची लवचिकता कमी होणे (Loss of skin elasticity)
त्वचेची लवचिकता कमी झाल्यामुळे देखील चेहऱ्यावर सूज येण्याची शक्यता आहे. वाढत्या वयाबरोबर त्वचेची लवचिकता ही कमी होते, त्यामुळेच रात्री द्रव साचतो आणि चेहऱ्यावर सूज येते. ते थांबवणे कठीण आहे. कारण वयानुसार त्वचा ही सैल होते. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक कोलेजनचे उत्पादन वाढवून तुम्ही त्वचेला काही प्रमाणात मऊ करू शकता.
मीठ आणि अल्कोहोल सेवन (Salt and alcohol consumption)
अल्कोहोल आणि मिठाच्या अतिसेवनामुळे ही चेहऱ्यावर सूज येऊ शकते. बऱ्याच वेळा सोडियमयुक्त (sodium) पदार्थांमुळे ही समस्या उद्भवते. चेहऱ्यावर सूज येणे हे डिहायड्रेशनचे (dehydration) लक्षण असू शकते. विशेषतः जेव्हा आपण जास्त प्रमाणात मीठ आणि अल्कोहोल वापरतो. डिहायड्रेशनच्या कमतरतेमुळे शरीरात पाणी साचू शकते.त्यामुळे चेहऱ्यावर सूज वाढू शकते.
सूज दूर करण्याचे मार्ग (Ways to relieve swelling)
१. हायड्रेटेड (Hydrated) राहण्यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे शरीरातील अतिरिक्त द्रव काढून सूज कमी करण्यास मदत होते.
२. खारट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ घेणे टाळा. कारण उच्च सोडियम पातळीमुळे पाणी धारणा होऊ शकते.
३. झोपताना डोके उंच ठेवण्यासाठी एकापेक्षा जास्त उशी वापरा. यामुळे, चेहऱ्याच्या ऊतींमध्ये द्रव जमा होणार नाही आणि तुम्हाला सूज येणार नाही.
४. सकाळी काही वेळ चेहऱ्यावर थंड स्नेह केल्याने सूज येण्यापासून खूप आराम मिळतो.
या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.
हे ही वाचा:
घरच्या घरी बनवा Healthy and Tasty नाचणीचे बिस्कीट
Winter Health Tips हिवाळ्यात का खावेत भाजलेले शेंगदाणे? जाणून घ्या फायदे