Thursday, November 30, 2023

Latest Posts

हाडांचे कॅल्शियम वाढवण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. अनेकांना वयाच्या तिशीमध्ये खूप त्रास जाणवायला लागतो.

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. अनेकांना वयाच्या तिशीमध्ये खूप त्रास जाणवायला लागतो. या वयात हाडे आणि दातांसाठी कॅल्शियमची गरज असते. विशेष म्हणजे ज्या महिला वयाच्या तिशीनंतर गर्भवती होतात त्यांना कॅल्शियमची जास्त गरज असते. गर्भधारणेदरम्यानही कॅल्शियम आवश्यक असते. दररोज महिलांना १००० ग्रॅम कॅल्शियमची गरज असते. वयाच्या तिशीनंतर हे फार महत्वाचे असते. रोजच्या जेवणात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने आणि इतर पौष्टिक घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. हाडे मजबूत करून, ऑस्टियोपोरोसिस या सारखे आजार कमी होण्यास मदत होते. तसेच हाडांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी काहीवेळा डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे. आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून हाडांचे आरोग्य मजबूत केले जाऊ शकते.

हाडे मजबूत राहण्यासाठी पालक, मेथी, मोहरीच्या हिरव्या भाज्या आणि केळीची पाने यांसारख्या भाज्या खाल्या पाहिजेत. त्यामुळे कॅल्शियम वाढण्यास मदत होते. दररोजच्या जेवणात थोड्या प्रमाणात का होईना हिरव्या भाज्यांचा समावेश केलाच पाहिजे. तिळाच्या बियांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. त्याच्यामुळे तुम्ही ते सॅलड किंवा ब्रेडवर टाकून खाऊ शकता. याशिवाय तुम्ही त्याची स्मूदीमध्ये देखील बनवून पिऊ शकता. याच्यामुळे फायबर आणि प्रथिन देखील मिळतात. हाडांचे कॅल्शियम वाढवण्यासाठी पनीर एक चांगला स्रोत आहे. शाकाहारी लोक आपल्या आहारात पनीरचा समावेश करू शकतात. बदामामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे मिश्रण असते. ज्याच्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. तसेच यांच्यामध्ये प्रथिने, फायबर आणि इतर जीवनसत्त्वांचे पॉवरहाऊस आहे. मासे खाल्याने कॅल्शियम वाढण्यास काही प्रमाणात मदत होते. तुम्ही तुमच्या आहारात सॅल्मन किंवा सार्डिन या दोन माशांचा समावेश करू शकता.

हे ही वाचा: 

सुप्रिया सुळेंनी केले स्पष्ट, पक्ष संस्थापकांसोबतच राहणार…

मनसेने केले स्पष्ट, आगामी निवडणूका…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss