Apple iPhone launched In India : युगुलांच्या आवडीचा मोबाईल ब्रॅण्ड म्हणजे Apple iPhone. जगातील लोकप्रिय कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲपलच्या नवीन आयफोन लॉन्च केला आहे. ॲपल कंपनीने आयफोन १६ ई (iPhone 16e) भारतात लाँच केला आहे. तसेच खास गोष्ट म्हणजे आयफोन स्वस्तात मिळावा अशी ग्राहकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये iPhone 15 Pro प्रमाणे Apple Intelligence फीचर आणि यात अॅक्शन बटनचा समावेश देखील करण्यात आला आहे. तसेच कंपनीनं प्रोसेसिंगसाठी A18 चिपचा वापर केला आहे. भारतात लाँच झालेल्या ॲपलच्या नवीन फोनची किंमत, फीचर्स आणि तुम्ही हा कधीपासून ऑर्डर करू शकणार आहात याबद्दल घ्या.
भारतातली आयफोनची किंमत
आयफोन 16e च्या बेस १२८ जीबी व्हेरियंटची किंमत यूएसएमध्ये $599 म्हणजेच अंदाजे ४९ हजार ५०० रुपयांपासून सुरू होते मात्र भारतात iPhone 16e मॉडेलची किंमत ५९ हजार ९०० रुपये असणार आहे. तर iPhone 16e च्या २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ६९ हजार ९०० रुपये आहे, तर ५१२ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ८९,९०० रुपये आहे. या दोन्ही फोनच्या किंमतीत २० हजाराचा फरक आहे. हा फोन २८ फेब्रुवारीपासून डिलिव्हरी देण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. iPhone 16e मध्ये तुम्हाला 6.1 इंचाची OLED स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये iPhone 15 Pro प्रमाणे Apple Intelligence फीचरचा समावेश आहे. तसेच कंपनीनं प्रोसेसिंगसाठी A18 चिपचा वापर केला आहे. कॅमेरा पाहता या स्वस्त iPhone 16e मध्ये तुम्हाला ४८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो. फोन ब्लॅक आणि व्हॉइट कलर ऑप्शनसह विकत घेता येईल.
iPhone 16e कॅमेरा
iPhone 16e मध्ये सिंगल ४८ एमपी फ्यूजन रियर कॅमेरा दिला असून 2x टेलिफोटो झूम पर्याय दिला आहे. ज्यामुळे युजर्सना मूळ फोटोची क्वाॅलिटी राखून अगदी फोटो झूम करून सहज काढता येऊ शकतो. कॅमेरा सिस्टीम पोर्ट्रेट मोड, नाईट मोड आणि एचडीआरला वेगवेगळ्या लाईट्समध्ये फोटोची क्वाॅलिटी टिकवून ठेवण्यास मदत करेल.व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी फ्रेम्स पर सेकंद आणि डॉल्बी व्हिजनपर्यंत ४के रेकॉर्डिंगलासुद्धा सपोर्ट करतो.