Monday, November 20, 2023

Latest Posts

बदलत्या हवामानामुळे तुमची मुलं आजारी पडतायत? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

बदलत्या हवामानामुळे तुमची मुलं आजारी पडतायत? 'या' गोष्टींची काळजी घ्या

बऱ्याचदा आपण पाहतो की बदलत्या हवामानात मुलं लगेच आजारी पडतात, विशेषतः जेव्हा हिवाळा आणि पावसाळा चालू होतो तेव्हा, कारण या हवामानात आजारांचा प्रादुर्भाव जास्त वेगाने पसरतो, जेव्हा हवामान बदलते तेव्हा मुलांना सामान्यतः सर्दी-खोकला,विषाणूजन्य ताप, संसर्ग आणि इतर संसर्गाचा त्रास उदभवू लागतो. या समस्या मुलांच्या कमी रोगप्रतिकारशक्तीमुळे होतात, अशा परिस्थितीत पालकांना त्यांच्या मुलांची काळजी आणि त्यांच्या लाईफस्टाईलची (Lifestyle) विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. जेणेकरून आपली मुले आजारी पडू नयेत त्यासाठी मुलांचा योग्य आहार,व्यायाम, खेळ, झोप याकडेही लक्ष दिले पाहिजे. व्यायाम हा प्रत्येक ऋतूत केला पाहिजे मग तो हिवाळा असो की पावसाळा, हे केवळ प्रौढांसाठीच नाही तर मुलांना देखील फायदेशीर ठरते. कारण, व्यायाम प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यायामामुळे शरीरात हॅप्पी हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे आपला मूड सुधारण्यास मदत होते. तसेच, सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात व्यायाम केल्याने शरीर बळकट होऊन रोगांशी लढण्यास मदत होते. त्यामुळे मुलांनीही नियमित व्यायाम केलाच पाहिजे.

मुलांच्या संतुलित आहाराची काळजी घ्या

मुलांना निरोगी ठेवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे. मुलांच्या आहारात सर्व पोषक तत्वांचा समावेश असावा. मुलांना प्रथिने, जीवनसत्त्वे, कर्बोदके, फायबरआणि खनिजे पुरेशा प्रमाणात मिळायला हवे. फळे, भाज्या,कडधान्ये, दूध आणि अंडी यांसारख्या पौष्टिक आहारामुळे मुलांची प्रतिकारक शक्ती मजबूत होते.

मुलांची झोप पूर्ण होणे तितकेच आवश्यक

लहान मुलांना पूर्ण झोप मिळणे अत्यंत गरजेचे आहे, विशेषतः १२ वर्षाखालील मुलांना किमान ९ तास झोप मिळणं आवश्यक आहे. झोप पूर्ण मिळाल्याने मुलांमध्ये तेज निर्माण होतं आणि मुलं ताजेतवाने राहतात.

मुलांच्या स्वच्छतेची काळजी घ्या

मुलांना नियमितपणे हात धुवायची सवय लावा, काहीही खाण्याआधी हात धुवायची सवय नेहमीच चांगली. हिवाळा आला की थंडीमुळे मुलं आंघोळ घेण्यास कंटाळा करतात. अनेक वेळा पालकही याकडे एवढंसं लक्ष देत नाहीत. पण असे न करता मुलांना दररोज कोमट पाण्याने आंघोळ घालावी आणि स्वच्छ कपडे घालावेत.

हे ही वाचा : 

Kerala मध्ये भीषण स्फोट!,प्रार्थना स्थळामध्ये एकामागोमाग एक तीन बॉम्बस्फोट

रोज तोच नाश्ता खाण्याचा कंटाळा आला? घरच्या घरी बनवा Tasty Bread Rolls

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss