Puffy Face : अनेक महिलांना चेहऱ्यावर सूज येण्याची समस्या असते. याची कारणे बरीच असतात. ज्यात चेहऱ्यावर जखम किंवा इन्फेक्शन झाल्यास (उदा. पिंपल्स, फुन्सी), सूज येऊ शकते. पुरेशी झोप न घेतल्यास त्वचेला आराम मिळत नाही, ज्यामुळे सूज येण्याची शक्यता असते. वाढलेल्या वजनामुळे चेहऱ्यावरची सूज वाढते.मानसिक तणावामुळे शरीरात हॉर्मोनल बदल होऊ शकतात, जे चेहऱ्यावरील सूजन वाढवू शकतात. अशी अनेक कारण असतात ज्यामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते. जर तुम्हाला चेहऱ्यावर सतत सूज येत असेल किंवा तुम्ही या समस्येपासून त्रस्त असाल तर यावर काही उपाय आम्ही तुम्हला सांगणार आहोत. नक्की वाचा.
वॉटर रेटेंशन कमी करण्यासाठी पाणी प्या : तुमचं शरीर हायड्रेटेड ठेवणं महत्त्वाचं आहे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील अतिरिक्त सॅल्ट आणि टॉक्सिन्स बाहेर निघून सूज कमी होईल. चेहऱ्यावरील सूजन कमी करण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. चहा, कॉफी आणि द्रव पदार्थांचे प्रमाण कमी करा. अल्कोहोलचे सेवन करत असाल तर ते टाळा. कारण अल्कोहोलमुळे शरीरातील अवयवांमध्ये पाणी जमा होते जे शरीरासाठी खूप धोक्याचे आहे. त्यामुळे अल्कोहोलचे कमी प्या आणि पाणी जास्त प्या.
कोकोनट ऑईल, बर्फाच्या तुकड्यांने मसाज : कोकोनट ऑईलमध्ये सूजन कमी करणारे गुणधर्म असतात, जे त्वचेला आराम देतात आणि सूजन कमी करतात. त्यामुळे कोकोनट ऑईलने रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने मसाज करा ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होईल. बर्फाच्या तुकड्यांनी चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण चांगलं होईल आणि सूज कमी होईल.
एलो व्हेरा जेल: एलो व्हेरा जेल थोड्या प्रमाणात चोळा. यामुळे त्वचेची सूज कमी होईल आणि आराम मिळेल. एक दिवस आड करून हा उपाय करा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. हे उपाय त्वचेसाठी आरामदायक आहेत. लक्षात ठेवा की जर सूज जास्त प्रमाणात असेल, तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका