Saturday, June 3, 2023

Latest Posts

तुमचे तूप भेसळयुक्त आहे का? या ट्रिकस वापरून तुपाची शुद्धता ओळखा

आजकाल भेसळयुक्त तुपाची बाजारात विक्री भरपूरप्रमाणात वाढली आहे. तुपाची किंमत हि जास्त असून या गोष्टीचा अनेक लोक फायदा घेतात. त्यामुळे बाजारात भेसळयुक्त तूप बनवून ते लोकांना कमी किमतीत विकतात. पण हेच भेसळयुक्त तूप तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.

आजकाल भेसळयुक्त तुपाची बाजारात विक्री भरपूरप्रमाणात वाढली आहे. तुपाची किंमत हि जास्त असून या गोष्टीचा अनेक लोक फायदा घेतात. त्यामुळे बाजारात भेसळयुक्त तूप बनवून ते लोकांना कमी किमतीत विकतात. पण हेच भेसळयुक्त तूप तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. शुद्ध तुपाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. लहानमुलांपासून ते मोठ्यामाणसांपर्यंत तूप खाणे हे आवश्यक आहे. आयुर्वेदात तर उपचारासाठी तुपाचा वापर अगदी मोठ्या प्रमाणावर केला जातो. तूप हा एक असा घटक आहे कि जो औषधासारखं काम करतो. तुपाचा वापर स्वयंपाकात अगदी मोठयाप्रमाणावर केला जातो. अश्या सर्व कारणांमुळे लोकांकडून तुपाची मागणी वाढली आहे. आणि म्हणूनच तुपाची किंमत हे बाजारात जास्त आहे. तुपाची मागणी हि जास्त असल्याने बहुतेक दुकानदार भेसळयुक्त तूप कमी किमतीत विकून याचा फायदा करून घेतात. तुपाचे विविध प्रकार असून ते गायीच्या वयानुसार व जातीवर अवलंबून असतात. काही प्रकार हे स्वस्त तर काही प्रकार हे महाग असतात. तुपाची भेसळ करण्यासाठी लोक अनेक प्रकारे शक्कल लढवतात. तुपात वनस्पती तेल, वितळलेले बटर, डालडा यांसारख्या स्वस्त आणि घातक दर्जाच्या वस्तूचा उपयोग करतात. तुपाचे सेवन केल्याने आपले आरोग्यबिघडू शकते. त्यामुळे शुद्ध तूप आणि भेसळयुक्त तूप यामधला फरक ओळखणे गरजेचे आहे. तर आम्ही दिलेल्या माहितीतून जाणून घेऊया तुपाची शुद्धता तपासणारे साधेसोप्पे घरगुती उपाय.

मिठाने तपासू शकता तुपाची शुद्धता

मिठाचा वापर करून तुम्ही त्वरित त्याची शुद्धता तपासून पाहू शकता. सर्वप्रथम तुम्ही एक भांडे घ्या आणि त्यात दोन चमचे तूप टाका. त्यात १/२ चमचे मीठ आणि त्याचबरोबर १/२ थेंब हायड्रोक्लोरिक ऍसिड (Hydrochloric acid) टाकून मिश्रण बनवून घ्या. साधारण २० मिनिटे ते मिश्रण असेच ठेऊन देऊन नंतर तुपाचा रंग तपासा. जर तूप लाल किंवा इतर कोणत्याही रंगाचे झाले तर समजावे ते तूप भेसळयुक्त आहे.

पाण्याने तपासू शकता तुपाची शुद्धता

पाण्याचा वापर करून तुम्हाला लगेच समजू शकते तूप हे शुद्ध आहे कि नाही. त्यासाठी तुम्हाला पाण्याने भरलेला एक ग्लास घ्यावा लागेल. त्यात ग्लासमध्ये एक चमचा तूप टाका. जर ते तूप पाण्याखाली बुडाले तर ते भेसळ तूप असेल आणि जर ते तूप पाण्यात तरंगू लागले तर ते शुद्ध तूप असेल. अशा रीतीने तुम्ही पाण्याचा उपयोग करून तुपाची शुद्धता तपासू शकता.

हातावर चोळून तपासू शकता तुपाची शुद्धता

तुपाची शुद्धता ओळखण्यासाठी तुम्ही तळहातावर तूप घेऊन साधारण १० ते १२ मिनिटे चांगल्याप्रकारे हातावर चोळून घ्या. आणि हाताचा वास घ्या. तुम्हाला जर तुपाचा वास येत नसेल तर ते तूप भेसळयुक्त आहे असे स्पष्ट होईल. कारण शुद्ध तुपाचा सुगंध अतिशय तीव्र असतो.

तूप उकळून घेऊन तपासू शकता तुपाची शुद्धता

भेसळयुक्त तूप ओळखण्यासाठी तुम्ही ते उकळूनही तपासू शकता. सर्वप्रथ एक भांड घ्या आणि त्यात ३/४ चमचे तूप टाकून उकळावून घ्या. आणि त्याच भांड्यात ते तूप २४ तास थंड करत ठेवा. २४ तासाने ते तूप थंड झाल्यावर तासून घ्या. जर तुपाचा रंग पिवळाच राहिला असून आधीसारखाच वास येत असेल आणि त्याबरोबरच ते तूप घट्ट झालेलं नसेल तर ते तूप शुद्ध आहे.

अश्या रीतीने तुम्ही तुपाची चाचणी करून त्याची शुद्धता ओळखू शकाल

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

उन्हाळ्यात चेहरा टॅन होतो? | Face tan in summer? Summer Tips

गरमीमुळे किचन मध्ये काम करवत नाही? कूल किचन साठी फॉलो करा आमच्या सालस टिप्स

Mother’s day निमित्त आईसाठी बनवा ‘हा’ खास केक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss