आपल्या स्वयंपाक घरात ज्या गोष्टी वापरल्या जातात त्यातल्या काही गोष्टी खराब होतात त्यासाठी आपण त्या फ्रिजमध्ये, टिश्यू पेपर किंवा एअर टाईट कंटेनर मध्ये पॅक करून ठेवतो तर असे न करता ही गोष्ट तुम्ही ६ महिने टिकवून ठेवू शकता. म्हणून नक्की ‘या’ टिप्स फॉलो करा.
‘कडीपत्ता’ हा आपल्या घरात रोजच्या जेवणामध्ये हमखास वापरतो. म्हणूनच कडीपत्ता भारतीय स्वयंपाकघरात एक महत्वाचा घटक मानला जातो. इतकंच नाही तर आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. कडीपत्त्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स असतात, जे पचनसंस्थेला सुधारण्यासाठी मदत करतात. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, आणि अपचन यासारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो. कडीपत्त्याच्य वापराने पदार्थाचा सुगंध आणि चव लज्जतदार होते, तसेच त्यात अनेक पोषक तत्वे असतात जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
बाजारातून आणलेला कडीपत्ता लवकर खराब होतो, त्यामुळे त्याचा जास्त उपयोग करता येत नाही. कडिपत्त्याला जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी काही खास टिप्स. या टिप्स फॉलो करत तर तुमचा कडीपत्ता ६ महिने खराब होणार नाही. जाणून घ्या या टिप्स.
> कडीपत्ता दीर्घकाळ ताजा राहण्यासाठी तेलाचा वापर एक उत्तम उपाय आहे. यासाठी सर्वप्रथम कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्या आणि नीट वाळवून घ्या. नंतर एका पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करून त्यात हा वाळवलेला कडीपत्ता घालून हलकेच परतून घ्या. गार झाल्यावर हा तेलात परतवलेला कडीपत्ता एका एअर टाईट डब्यात भरून ठेवा.
> तेलाचा वापर न करता तुम्ही काडिपत्त्याला एका पॅनमध्ये कोरडा होईपर्यंत परतवून घ्या आणि एका डब्यात भरून ठेवा.
> कडीपत्त्यांला हवेपासून संरक्षण देण्यासाठी, त्याला काचेच्या हवाबंद जारमध्ये ठेवा. त्यामुळे हवेच्या संपर्कात न आल्यामुळे कडीपत्ता काळा होणार नाही.
> ताज्या कडीपत्त्यांना ऑइल किंवा विनेगरमध्ये ठेवून देखील जास्त काळ टिकवता येतात. या पद्धतीने कडीपत्त्यांची चव आणि पोषणतत्त्वे जास्त काळ टिकून राहतात.
हे ही वाचा :