Tuesday, April 23, 2024

Latest Posts

जाणून घ्या ड्राय शॅम्पू ची सविस्तर माहिती फक्त एका क्लिकवर

आजकाल आपल्याला केसांच्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. प्रदूषणामुळे तर चक्क केसांची वाट लागते. वाढत्या तापमानामुळे आपले केस हे बरेचसे डॅमेज (Damage) होतात. आपल्या केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो.

आजकाल आपल्याला केसांच्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. प्रदूषणामुळे तर चक्क केसांची वाट लागते. वाढत्या तापमानामुळे आपले केस हे बरेचसे डॅमेज (Damage) होतात. आपल्या केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण केसांना तेल लावून शॅम्पूने चांगल्याप्रकारे स्वच्छ करून नंतर त्याला कंडिश्नरदेखील लावतो. केस स्वच्छ करण्यासाठी काही लोक रोज केस धुतात पण खरंतर रोज केस धुणे हे चांगले नसते. केसांची काळजी घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. आपण अनेक बाजारातून वेगवेगळे शॅम्पू (Shampoo ) विकत घेतो. पण प्रत्येकाला तेल लावून शॅम्पू करून कंडिशनर (Conditioner) लावून केस स्वच्छ धुण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यासाठी काही जण आपल्याला ड्राय शॅम्पू (Dry Shampoo ) लावण्याचा सल्ला देतात.

ड्राय शॅम्पू हे केसांना लावण्याचे प्रोडक्ट आहे. ड्राय शॅम्पू लावल्याने आपल्याला केस धुण्याची गरज पडत नाही. ड्राय शॅम्पू हे आपल्या केसांना स्वच्छ करतात. ड्राय शॅम्पू मुळे आपल्या केसातील चिकटपणा आणि आपल्या केसातील मळ हा पूर्णपणे निघून जातो. ड्राय शॅम्पू हे प्रामुख्याने स्प्रे(Sprey) च्या स्वरूपात असतात. परंतु या ड्राय शॅम्पूचा वापर अतिप्रमाणात केला तर ते आपल्या केसांसाठी घातकही ठरू शकते. आपल्या केसांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होऊ शकते. ड्राय शाम्पूचा आपण पाण्याशिवाय वापर करू शकतो. ड्राय शॅम्पू हे फक्त स्प्रे स्वरूपातच नसून पावडरच्या स्वरूपात देखील उपलब्ध असतात.

ड्राय शॅम्पूमुळे आपले केस स्वच्छ करण्याचा वेळ वाचतो. आणि ड्राय शॅम्पूचा वापर केल्याने आपल्या केसातील तेलकट पण पूर्णपणे निघून जातो. कोरड्या शॅम्पू मध्ये अल्कोहोल (Alcohol) आणि त्याच बरोबर स्टार्च चे प्रमाण असते त्यामुळे आपल्या केसांतील तेल आणि घाम ते घटक शोषून घेण्याचे काम करतात. ड्राय शॅम्पू मुळे आपापले केस स्वच्छ होतात आणि आपल्या केसांभोवती चांगला सुगंधही पसरतो. त्यामुळे आपल्याला फ्रेश (Fresh) सुद्धा वाटते. ड्राय शॅम्पू केसांना लावल्यानंतर आपण टाळू वर अलगद हाताने मसाज देखील करू शकतो. ड्राय शॅम्पू चा फायदा म्हणजे आपल्याला केस पाण्यात धुवावे लागत नाही. पाण्याशिवाय आपले केस स्वछ होतात.

ड्राय शाम्पूच्या फायद्यासोबतच त्याचा तोटाही आहेच. ड्राय शाम्पूच्या अति वापरामुळे आपल्या केसांचे भरपूर प्रमाणात नुकसान होते. त्याचबरोबर त्याचा गंभीर परिणाम आपल्या केस वाढीवर होऊ शकतो. आपल्या केसांची वाढ थांबू शकते. आपण ड्राय शॅम्पू आठवड्यातून एकदा अथवा दोनदा वापरू शकतो. ड्राय शॅम्पूचा वापर केल्याने त्याचा परिणाम अत्यंत वाईट होऊ शकतो. ड्राय शॅम्पू आपल्या स्कॅल्पमधील (Scalp) अतिरिक्त तेल शोषून घेऊ शकते. म्हणूनच हा शॅम्पू योग्य प्रमाणातच वापरावा.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

केजरीवाल यांनी २००० रु.च्या नोटसंदर्भात पंतप्रधान यांची “त्या” शब्दात उडवली खिल्ली

Box Office वर सुपरहिट ठरणाऱ्या ‘The kerla story’ साठी अदाने घेतले ‘इतके’ मानधन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss