Skoda Kylaq SUV मध्ये फक्त एकच पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. यात १.० लीटर टीएसआय टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ११५ पीएस पॉवर आणि १७८ एनएम टॉर्क जनरेट करते. यात ६-स्पीड मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही Skoda Kylaq SUV चांगले मायलेज देईल अशी अपेक्षा आहे.
Skoda Kylaq SUV चे फीचर्स कोणते?
Skoda Kylaq SUV ची केबिन कुशाकसारखीच दिसत आहे. डॅशबोर्डची मांडणी सारखीच असून, साईड व्हेंट, क्लायमेट कंट्रोल पॅनेल, टू-स्पोक स्टीअरिंग आणि ८ इंचाचे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर असे घटक दोन्ही मॉडेल्ससाठी समान आहेत. यात १० इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे Skoda Kylaq SUV च्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत कायलॅक या सेगमेंटमध्ये आपल्या अपेक्षांवर खरा उतरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. यामध्ये सनरूफ (सिंगल पॅन), कीलेस एंट्री, वायरलेस फोन चार्जर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, फ्रंट सीट व्हेंटिलेशन आणि लेदरेट अपहोल्स्ट्री सारखे फीचर्स दिले आहेत.
सर्वात वेगवान कॉम्पॅक्ट SUV
सेफ्टी फीचर्समध्ये ६ एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक आणि आयसोफिक्स चाइल्ड सीट माऊंट यांचा समावेश आहे. स्कोडाचा दावा आहे की, कायलॅक केवळ १०.५ सेकंदात 0-१०० किमी प्रति तास वेग पकडू शकते, ज्यामुळे ही सेगमेंटमधील सर्वात वेगवान कॉम्पॅक्ट एसयूव्ही बनते.
Skoda Kylaq ची कुणाशी स्पर्धा?
स्पर्धा करण्यासाठी सज्ज असलेल्या Skoda Kylaq ची टक्कर ह्युंदाई व्हेन्यू, टाटा नेक्सॉन, मारुती सुझुकी ब्रेझा आणि किआ सोनेट सारख्या लोकप्रिय मॉडेल्सशी होईल.
हे ही वाचा:
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर